Voting  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: गोव्यात मतदानाला झाली सुरुवात

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभेच्या सर्व चाळीसही जागांकरिता एकाच टप्प्यात राज्यातील 1722 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. सारे जग आजचा प्रेमाचा दिवस असणारा व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना गोव्यात लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. आजचा दिवस मतदार राजाचा आहे. (Goa Election Live Updates)

दरम्यान, उत्तर प्रदेश आणि गोव्यात (Goa) सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत, तर उत्तराखंडमध्ये सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीचा हा दुसरा टप्पा असला तरी गोवा आणि उत्तराखंडमध्ये आज प्रथमच आणि या एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदान असलेल्या तिन्ही राज्यांत सध्या भाजपचे सरकार आहे. निवडणूक आयोगाने गेल्या वर्षभरापासून या दिवसासाठी तयारी केली असून जास्तीत जास्त मतदान व्हावे याकरिता निवडणूक आयोगाने राज्यात विविध प्रकारची जनजागृती केले आहे. मतदान भयमुक्त आणि शांततेत व्हावे यासाठी 8500 पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. या मतदानाकरिता सुमारे 24 हजारांहून अधिक शासकीय कर्मचारी कार्यरत असून मतदानासाठी लागणारे साहित्य घेऊन हे कर्मचारी राज्यभरात पसरलेल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले. राज्यात 1722 मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रावर 5 मतदान अधिकारी कार्यरत राहणार असून २ अधिकारी राखीव असणार आहे. याशिवाय अतिरिक्त कर्मचाऱ्यांनाही मतदानाची ड्युटी लावली आहे.

26 महिला तर 275 पुरुष उमेदवार

1722 मतदान केंद्रात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 11 लाख 64 हजार 994 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यामध्ये 5 लाख 62 हजार 790 पुरुष तर 5 लाख 93 हजार 968 महिला मतदार आहेत. तर 4 तृतीयपंथीही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या 40 मतदारसंघांसाठी एकूण 587 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी 382 उमेदवारी अर्ज वैध ठरले तर, 153 अर्ज अवैध ठरले. यामध्ये 34 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे 301 उमेदवार आता रिंगणात आहेत. दक्षिण गोव्यातून 154 तर उत्तर गोव्यातून 156 उमेदवार भवितव्य आजमावणार आहेत. गोव्याच्या निवडणुकीत यंदा फक्त 26 महिला उमेदवारच निवडणूक लढवत आहेत. त्या तुलनेत 275 पुरुष उमेदवार निवडणुकीत (Election) उभे आहेत. यापैकी 68 उमेदवार हे अपक्ष आहेत.

तीन माजी मुख्यमंत्री रिंगणात

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यासह रवी नाईक, दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव हे तीन माजी मुख्यमंत्री. तर 10 मंत्री निवडणूक रिंगणात आहेत. यात माविन गुदिन्हो मायकल लोबो, विश्वजीत राणे, मिलिंद नाईक आदींचा समावेश आहे.

निवडणुकीदरम्यान कोणताही चुकीचा प्रकार घडू नयेत यासाठी 81 फ्लाईंग स्कॉड त्याचबरोबर स्थानिक सव्र्हींलन्स टीम आणि गोवा पोलिस तैनात ठेवले आहेत. ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत अशा लोकांवर कारवाई केली आहे.

- कुणाल, मुख्य निवडणूक अधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT