Parrikar Family Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: उत्पल पर्रीकरांचं देवाकडे साकडं, कुटुंबीय झाले भावूक !

उत्पल पर्रीकरांनी (Utpal Parrikar) अपक्ष म्हणून अर्ज भरण्याअगोदर महालक्ष्मी मंदिरात जाऊन आपल्या परिवार आणि कार्यकर्त्यांसह देवीचे दर्शन घेतले.

दैनिक गोमन्तक

गोव्यात आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजाकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यामध्ये सत्तेमध्ये असणाऱ्या भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील काही दिवसांपासून पणजी मतदार संघ राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. या मतदार संघातून भाजप कोणता उमेदवार देणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहीलं होतं. मात्र पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपने पणजी मतदारसंघातून माजी संरक्षणमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Chief Minister Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना डावलून आमदार बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) यांना भाजपनं तिकीट दिलं. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून पणजीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. (Utpal Parrikar family became emotional while filing nomination papers from Panaji constituency)

दरम्यान, माजी संरक्षणमंत्री तथा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांना पणजी मतदार संघातून भाजपाने उमेदवारी नाकारली. त्यानंतर नाराज झालेल्या उत्पल पर्रीकरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरण्याअगोदर महालक्ष्मी मंदिरात जाऊन आपल्या परिवार आणि कार्यकर्त्यांसह देवीचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन आल्यानंतर मनोहर पर्रीकर यांची बहिण लता शंखवाळकर आणि थोरले बंधू अवधुत पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना भावूक झाले.

शिवाय, मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, ‘उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदार संघातून म्हणून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांनी पाठिंबा देऊ.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT