Ramdas Athawale Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: 'गोव्यात शिवसेनेचं अस्तीत्व नगण्य'

गोव्यात शिवसेना (Shiv Sena) काँग्रेसची आघाडी होईल असं मला वाटत नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पनवेलमध्ये बोलत असताना सांगितले.

दैनिक गोमन्तक

गोव्यात आगामी काळात विधानसभा निवडणूका होत आहेत. यातच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. गोव्यातील आगामी विधानसभा चांगलीच रंगतदार होणार असल्याची चिन्हं दिसत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागले आहेत.

यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेस पक्षाने देखील गोव्याच्या विधानसभा निवडणूकीत एन्ट्री केली आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग सफल करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस स्वबळावर यंदाची निवडणूक लढविण्याची तयारी करु लागली आहे. कॉंग्रेसने स्थानिक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर युती केली आहे.

दरम्यान, ''गोव्यात शिवसेनेचं अस्तीत्व नगण्य आहे. शिवसेनेने अनेक वेळा प्रयत्न करुन ही एकदाही आमदार निवडून येऊ शकला नाही. गोव्यात शिवसेना काँग्रेसची आघाडी होईल असं मला वाटत नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पनवेलमध्ये बोलत असताना सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले, 'भाजपला गोवा जिंकण्यात अशक्य काहीच नाही. गोव्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. गोव्यातील 40 जागांवर आरपीआयने भाजपला पाठिंबा दिला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT