Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election 2022: या उमेदवारांचे नशीब होणार मतपेटीत बंद

301 पैकी 80 उमेदवारांवर गुन्हे नोंद झाले असून त्यातील 29 जणांवर आरोप निश्चित

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात विधानसभा निवडणुकीत मतदान सुरू होणार असून उमेदवारांचे भविष्य आता मतदारांच्या हातात आहे. गोव्यात यावेळी बहुपक्षीय लढत होण्याची अपेक्षा आहे. देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यातील 301 उमेदवारांचे भवितव्य आता 11 लाख 64 हजार 522 मतदारांच्या हाती आहे. (Goa Assembly Election 2022 Live Updates)

दरम्यान, गोवा विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या 301 पैकी 80 उमेदवारांवर गुन्हे नोंद झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील 29 जणांवर आरोप निश्चित झालेत. तर दोघांना न्यायालयाने शिक्षाही ठोठावली आहे. निवडणुकीसाठी सर्व पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.

अल्पवयीन मुलींवर बलात्कार, विनयभंग, महिला अत्याचार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, भ्रष्टाचार, चोरी, धमकी देणे, पोलीस स्थानकावर हल्ला, मारहाण, फसवणूक व गुन्हेगारी कारस्थान, रस्ता रोखणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, जुगार, रेल्वे वाहतूक अडवणे, दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे, आंदोलन करणे, धनादेश न वटणे, कोविड नियमांचे उल्लंघन अशा अनेक गुन्ह्यांत न्यायालयात आरोपपत्र दाखल होऊन खटले सुरू झाले आहेत किंवा विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे नोंद झाले आहेत, अशी माहिती 80 उमेदवारांनी आपापल्या प्रतिज्ञापत्रातून सादर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT