Goa Election 2022: अखेर ‘तो’ स्टिंग व्हिडिओ हटविला

कॉंग्रेस नेते सुनील कवठणकर यांनी नोंदवली स्टिंग ऑपरेशन संदर्भातील तक्रार
Congress
Congress Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचार संपल्यानंतर ‘हिंदी खबर’ चॅनलने कथित स्टिंग ऑपरेशनचे वृत्त प्रसारित केल्याने आणि त्यावर कॉंग्रेसने आक्षेप नोंदवल्यावर निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेऊन यू-ट्युबवरून तो स्टिंग व्हिडिओ काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा संपूर्ण कार्यक्रम यू-ट्युबवरून हटवण्यात आला आहे. (Goa Election 2022 Voting Day Live Updates)

Congress
Goa Election 2022: गोव्यात 5 वाजेपर्यंत 75.29 टक्के मतदान

यासंदर्भातील कॉंग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी दिली होती. या कथित कार्यक्रमात स्टिंग ऑपरेशन करून तृणमूल कॉंग्रेसचे चर्चिल आलेमाव, कॉंग्रेसचे आवेर्तान फुर्तादो, संकल्प आमोणकर आणि वेळ्ळीचे कॉंग्रेसचे उमेदवाराने पैसे घेतल्याचे दाखवण्यात आले आहे.

Congress
पंतप्रधान मोदींचा सकाळीच फोन, म्हणाले...:मुख्यमंत्री सावंत

अर्थात हा सर्व व्हिडिओ मोडतोड करून बनवल्याचा आरोप कॉंग्रेस आणि तृणमूलने केला आहे. तशा स्वरूपाच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दोन्ही पक्षांनी दिले आहे. हे प्रकरण लोकप्रतिनिधी कायदा 126 (ब) नुसार हाताळण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com