Sanjay Raut And Devendra Fadnavis  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022; गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता येणे नाही: संजय राऊत

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे गोव्याचे राजकारण आरोप प्रत्यारोपाने चांगलेच पिंजून निघत आहे. गोवा निवडणुक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे सतत गोव्यातील राजकारणावर लक्ष ठेऊन आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत हे विरोधकांना घेरण्याची संधी सोडत नाही. सध्या गोवा दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांनी माध्यमांशी बोलतांना भाजपावर आणि ईडीच्या कारवाईवर चांगलेच तोंडसुख घेतले. तर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोलाही लगावला आहे.

ते म्हणाले की,“गोव्यात देवेंन्द्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत कारण गोवा हे राज्य लहान आहे, पण त्यांच्यावर असलेली जबाबदारी ही मोठी आहे.पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. गोव्यातील जमिनीवरचं वातावरण फडणवीस व भाजप साठी म्हणावे तेवढे चांगले नाही. खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांज्या विरुद्ध राज्यात आणि मतदारसंघात फार असंतोष आहे. भाजपाला या निवडणूकीतही बहुमत मीळणार नाही. तर काँग्रेस हाच गोव्यात सर्वात मोठा पक्ष असेल. पण बहुमत नसतानांही सरकार बनवणं याला लोकशाहीत हत्या, भ्रष्टाचार, राजकीय व्याभिचार म्हणतात”,असं राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

मतांचे विभाजन झालं तर भाजपला फायदा

गोव्यात गेल्या निवडणूकीत आम्ही कमी पडलो हे मान्य असले तरी, येणाऱ्या काही वर्षात शिवसेनेचा पणजीत आमदार असेल असा विश्वास ही यावेळी राऊत यांनी व्यक्त केला. स्व:ताला सेक्युलर पक्ष म्हणत असलेल्या काँग्रेसने (Congress) आपल्या उमेदवारांना मंदिरात शपथ दिली आहे. त्यामुळे हे कसले सेक्युलर पक्ष असे म्हणत राऊत यांनी गोवा काँग्रेसलाही टोला लगावला आहे.

आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांवर भाजपची B टीम असल्याचा सतत आरोप होत आहे आणि ते खरे ही असू शकते, कारण आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे दोन्ही पक्ष येथे नविव आहेत आणि त्यांची इथ ताकत नाही. पण जर मतांचे विभाजन झालं तर निश्चितच याचा भाजपला फायदा होईल.

आमचीही वेळ येईल तेव्हा काय कराल

भाजप गोव्यात दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे भाषण ऐकून मत मागत आहे तर दुसरीकडे मात्र त्यांच्या मुलाला तिकीट दिले नाही. ही अशी दुजाभावाची वागणूक देणे योग्य नाही. त्यामुळे याचा परिणाम निश्चितच या निवडणुकीत भाजपवर होणार असल्याचं त्यांनी सांगितले. मी भाजपाच्या विरोधात लढतो आहे. कारण त्यांचं सरकार मी महाराष्ट्रात येऊ दिलं नाही असा त्यांचा दावा आहे.पण जर भाजपाला मला तुरुंगात टाकायचं असेल, तर त्यांनी जरूर टाकावं. माझी तयारी आहे.

पण किती दिवस, येथे कोणी अमर पट्टा घेऊन येत नाही. आमचीही वेळ येणार तेव्हा काय कराल, असा सवालही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. आमच्याकडे सुध्दा माहिती आहे. दिल्लीतून, महाराष्ट्रातून कुठे कुठे पैसे जातो, पैसा कोण पुरवते. दिल्लीमध्ये एक व्यक्ती कोणाचे पैसे कुठे पुरवतो हे आम्हाला सर्व माहित आहे. योग्य वेळी मी सविस्तर बोलेन असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

“मला मुंबईत येऊ द्या, मी पाहातो काय करायचं ते”,ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा!

पोलिसांची बदली करण्याचा अधिकार हा राज्यसरकारचा आहे. कोणती यादी अधिकृत आणि कोणती अनधिकृत करायची हे ठरवणारी सीबीआय आणि ईडी कोण असेही राऊत यावेळी म्हणाले. भाजप फक्त ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी या तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. परमबीरला संरक्षण कोणी दिलं. मग कोणच्या स्टेटमेंटवरुन काय आरोप करताय असेही ते म्हणाले. “ज्यांच्या तोंडातून हे आरोप करत आहेत, ते उकीरड्यावरचे कुत्रे आहेत. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाहीत. ते खोटे कागदपत्र बनवतात, खोटे आरोप करतात. करू द्या. माझा न्यायालयावर विश्वास आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

Anti Aircraft Missile System: कोणत्या देशांकडे आहे बेस्ट एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम; भारताचं काय स्टेटस?

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

SCROLL FOR NEXT