100 वर्षांनंतर रशियात पार पडले शाही लग्न, युरोपीय राजघराण्यांनी लावली उपस्थिती

रशियामध्ये (Russia) झारचे (Tsars) माजी वंशज मिखाईलोविच रोमानोव्ह यांनी शुक्रवारी इटलीतील एका सामान्य मुलीशी लग्न केले.
Mikhailovich Romanov
Mikhailovich Romanov Twitter/ @nowthisnews
Published on
Updated on

रशियामध्ये (Russia) झारचे (Tsars) माजी वंशज मिखाईलोविच रोमानोव्ह (Mikhailovich Romanov) यांनी शुक्रवारी इटलीतील एका सामान्य मुलीशी लग्न केले. विशेष म्हणजे हा शाही विवाह रशियामध्ये 100 वर्षांनंतर पार पडला आहे. यापूर्वी, रोमानोव्हा घराण्यातील शेवटचा विवाह 127 वर्षांपूर्वी निकोलस II यांनी अलेक्झांड्राशी केले होते. या भव्य शाही लग्नात, संपूर्ण युरोपातील प्रसिध्द राजघराणे उपस्थित राहिली आहेत.

ग्रँड ड्यूक मिखाइलोविक रोमानोव्हने सेंट पीटर्सबर्ग (St. Petersburg) येथील सेंट इसाक कॅथेड्रल येथे इटालियन मंगेतर व्हिक्टोरिया रोमानोवा बाटोरीनीशी लग्न केले. लग्नाचे सर्व विधी रशियन ऑर्थोडॉक्स (St. Isaac’s Cathedral) पद्धतीने यावेळी पार पडले.

Mikhailovich Romanov
8 वर्षीय निकोल ऑलिव्हिरा बनली जगातील सर्वात तरुण खगोलशास्त्रज्ञ!

झारचे नेमके काय झाले?

जॉर्ज मिखाइलोविकचे पणजोबा, ग्रँड ड्यूक किरिल व्लादिमीरोविच (Grand Duke Kirill Vladimirovich) राजघराण्याचा भाग होते. 1917 मध्ये, रशियामध्ये झालेल्या बोल्शेविक क्रांतीनंतर ते फिनलंडमध्ये पळून गेले. नंतर संपूर्ण कुटुंब दक्षिण युरोपमध्ये स्थायिक झाले. रशियाचा शेवटचा झार (सम्राट) निकोनस दुसरा, त्याची पत्नी आणि पाच मुलांना क्रांतिकारकांनी 1918 मध्ये गोळ्या घालून ठार मारले. 40 वर्षीय जॉर्ज मिखाइलोविकचा जन्म माद्रिदमध्ये झाला असून त्याने आपले आयुष्य स्पेन आणि फ्रान्समध्ये घालवले. जॉर्ज मिखाइलोविचने 1992 मध्ये पहिल्यांदा रशियाला भेट दिली. 2019 मध्ये, ते मॉस्कोला गेले, जिथे त्याने चैरिटी प्रोजेक्टवर बरचे काम केले.

Mikhailovich Romanov
ड्रॅगन गरीब देशांच्या ऐक्य आणि अखंडतेला धोका पोहोचवतोय: रिपोर्ट

निकोलस द्वितीय कॅनोनाइज्ड

रोमनोव्ह राजघराण्याने रशियावर 300 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. त्यापूर्वी निकोलस द्वितीयने 1917 च्या सुरुवातीला सत्ता सोडली होेती. रशियाची नव्याने स्थापना करण्यासाठी 1917 मध्ये बोल्शेविक क्रांती झाली. त्यानंतर पुढची तब्बल 70 वर्षे रशियात साम्यवादी राजवट होती. 2000 मध्ये, रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चने निकोलस II ला संत घोषित केले. निकोलस द्वितीयकडे सोव्हिएत अधिकाऱ्यांनी एक कमकुवत नेता म्हणून पाहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com