Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्याचा मुख्यमंत्री कोण हे पक्षश्रेष्ठीच ठरवणार : विश्वजीत राणे

विश्वजीत राणेंनी राजभवनावर जात राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चांना ऊत

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात सध्या मुख्यमंत्रीपदाचा पेच काही सुटता सुटेना असं चित्र आहे. विद्यमान मुख्यमंत्री सध्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत असले तरीही त्यांच्या मुख्यमंत्रीपदावर मात्र अनेकांची नजर आहे. गोव्यात मुख्यमंत्रीपदासाठी विश्वजीत राणेंचं आव्हान प्रमोद सावंतांना पेलावं लागणार आहे. अगदी कमी मतांच्या फरकाने निवडून आलेल्या प्रमोद सावंतांसमोर वाळपईत विरोधकांचा सुपडासाफ करणाऱ्या विश्वजीत राणेंचं तगडं आव्हान उभं आहे.

विधानसभा निवडणुकीचा (Goa Election) निकाल लागल्यानंतर विश्वजीत राणे हे सातत्याने भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. राणेंनी राजभवनावर जात राज्यपालांची भेटही घेतली होती, यामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. आता विश्वजीत राणेंनी मुख्यमंत्रीपदाच्या वादावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. भाजपच्या सर्व आमदारांमध्ये एकमत आहे. मात्र गोव्याचा पुढचा मुख्यमंत्री (CM) कोण होणार हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील असंही विश्वजीत राणेंनी स्पष्ट केलं आहे.

भाजपचे (BJP) केंद्रीय निरीक्षक आज मंगळवारी गोव्यात दाखल होणार आहेत. पाचपैकी चार राज्यात भाजपला विजय मिळाल्याने सर्व राज्यांमध्ये एकाचवेळी सत्तास्थापनेचा दावा करण्याचा भाजपचा इरादा आहे. त्यामुळेच केंद्रीय निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रणनीती आखली जाणार आहे. दरम्यान जेनिफर मोन्सेरात यांच्यासह दिव्या राणे यांचं नावही मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात आहे. विश्वजीत राणे दिव्या राणेंच्या मंत्रिपदासाठी आग्रही असल्याचीही चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT