भाजपच्‍या 80 टक्के आमदारांचा मगोच्या पाठिंब्याला तीव्र विरोध

काठावरचे बहुमत मिळालेल्या भाजप सरकारला मगो पक्षाच्या दोन विधिमंडळ सदस्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला
Goa Politics : Maharashtrawadi Gomantak Party & BJP
Goa Politics : Maharashtrawadi Gomantak Party & BJPDainik Gomantak

पणजी: काठावरचे बहुमत मिळालेल्या भाजप सरकारला मगो पक्षाच्या दोन विधिमंडळ सदस्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र मगोचा पाठिंबा घेण्याबाबत भाजपच्या 80 टक्के आमदारांनी विरोध केला असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे. युती आणि पाठिंबा घेण्याबाबतचे निर्णय केंद्रीय नेते घेतात यावेळीही ते घेतील, असेही ते म्हणाले.

Goa Politics : Maharashtrawadi Gomantak Party & BJP
लोलयेतील मायलेकीच्‍या मृत्‍यूबाबत वाढता गूढ

विधानसभेत भाजपला केवळ 20 जागा मिळाल्या असून अपक्षांबरोबर इतर छोट्या पक्षांच्या मदतीची गरज आहे. हे ओळखून भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी मगो पक्षाला पाठिंबा देण्याची विनंती केली होती, त्यानुसार मगो पक्षाने बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. मगोचे विधानसभेत सुदिन ढवळीकर आणि जीत आरोलकर हे दोन आमदार आहेत. सरकारला मगो पक्षाचा पाठिंबा घेण्याबाबत फोंडा, मडकई ,शिरोडा, प्रियोळ आणि मांद्रे भाजप गटनेत्यांचा विरोध आहे. याबरोबरच अनेक भाजप आमदारांनीही विरोध केला आहे आता हा विरोध वाढत असल्याने केंद्रीय नेते आणि राज्य भाजप नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com