MLA Rohan Khanwate Dainik Gomantak
गोवा निवडणूक

महिन्याभरातच काँग्रेसला सोडचिठ्ठी; खंवटे यांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह

आमदार खंवटे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर नाकर्तेपणाचे खापर फोडत राजीनामा दिल्यामुळे आता आमदार खंवटे यांच्या भविष्यातील पक्षीय राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमन्तक

MLA Rohan Khanwate: विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर पर्वरी मतदारसंघाचे अपक्ष आमदार रोहन खंवटे (MLA Rohan Khanwate) यांच्या कार्यकर्त्यांनी अनपेक्षितरित्या 9 नोव्हेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या कार्यकर्त्यांनंतर रोहन खंवटे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा राजकीय अंदाज आणि अटकळ बांधली जात होती. मात्र, महिन्याभरातच या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर नाकर्तेपणाचे खापर फोडत राजीनामा दिला आहे. या राजीनामा सत्रामुळे आमदार खंवटे यांच्या भविष्यातील पक्षीय राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खंवटे आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाहीत हे आजच्या कार्यकर्त्यांच्या कृतीवरून स्पष्ट झाले.

गेल्या महिन्याभरात काँग्रेसने या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत गट समिती स्थापना करून कार्यकर्त्यांना कामाची विभागणी करावी अशी अपेक्षा या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी यातले काहीच केले नाही.

विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने कार्यकर्त्यांच्या या सकारात्मक पावलाचा विचार करून रोहन खंवटे यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी हालचाली करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. राजीनामा पत्रावर गुपेश नाईक, दीपराज नाईक, नारायण नाईक यांच्यासह 17 जणांच्या सह्या आहेत.

कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक : खंवटे

पर्वरी मतदारसंघातून अपक्ष म्हणून आगामी निवडणूक लढविणार आहे. मी कोणत्याही भाजप नेत्याशी चर्चा केली नाही तसेच मला भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मी भाजपमध्ये जाणार या सर्व अफवा आहेत. काँग्रेसबरोबर न जुळल्याने तसेच अपमानास्पद वागणूक मिळाल्याने माझ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून आगामी निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पर्वरी मतदारसंघाचे आमदार रोहन खंवटे यांनी आज दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025 Final: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल सामना? Live मोफत कुठे पाहता येणार?

बॉलिवूडची 'श्री'कन्या, साऊथची 'अचियम्मा'! जान्हवी कपूरच्या 'Achiyyamma' लूकची हवा; राम चरणसोबत गाजवणार दक्षिणी सिनेमा

Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

Goa Today's News Live: तुळशी विवाहाची जय्यत तयारी; साहित्य खरेदीसाठी साखळी बाजारात गर्दी

Konkani Drama Competition: फसलेला प्रयोग, पिकिल्ली पानां तुटिल्ली मना; नाट्यसमीक्षा

SCROLL FOR NEXT