बार्देशमधील आमदाराच्या 'भाजप' प्रवेशावर शिक्का मोर्तब..!

गेले 15 दिवस होते संपर्कात : वरिष्ठ नेते अमित शहा यांच्याकडून हिरवा कंदील
Goa Politics One MLA joins BJP
Goa Politics One MLA joins BJPDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी (Goa Politics) : बार्देशमधील एका आमदाराचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते भाजप (Goa BJP) नेत्यांच्या संपर्कात होते. गेल्या आठवड्यात कदंब पठारावरील हॉटेल हिल्टनमध्ये निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सी. टी. रवी यांच्याशी त्यांनी बोलणी केली होती. तत्पूर्वीही ते फडणवीस यांना भेटले होते.

Goa Politics One MLA joins BJP
...म्हणून करण्यात आला आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा उद्‌घाटन कार्यक्रम रद्द!

या आमदाराने काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या नेत्यांसमोर ठेवला होता. त्यांच्या भावाला सांताक्रुझ मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. काँग्रेसने हा प्रस्ताव गेल्या पंधरा दिवसांपासून लोंबकळत ठेवल्याने आणि सांताक्रुझ मतदारसंघात उमेदवारी रुडाल्फ फर्नांडिस यांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने या बंधूंनी आपला पवित्रा बदलला आहे. काँग्रेस सध्या अनिर्णित गर्तेत अडकली असून गुरुवारी या आमदाराच्या भावाने आपल्याला निवडणूक लढवण्यामध्ये इंटरेस्ट नसल्याचे जाहीर केले होते. परंतु दुसरीकडे त्यांची भाजपबरोबरची बोलणी निर्णायक पातळीवर पोहोचली होती.विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे पक्षांतर आणि राजकीय उलथापालथी वेगाने वाढत आहेत.

Goa Politics One MLA joins BJP
डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर चार स्टार मानांकन

वैचारिक ध्येयधोरण आणि नैतिकता यांना तिलांजली दिली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आज या पक्षात असणारे नेते उद्या दुसऱ्या पक्षात दिसत आहेत.

मुक्ती दिनापूर्वी गोव्यात राजकीय स्फोट

भाजपच्या एका ज्येष्ठ सदस्याने या आमदाराच्या भाजप प्रवेशाला दिल्लीश्रेष्ठींची मान्यता मिळाल्याची माहिती दिली असून ते म्हणाले, की प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला नाही. मात्र, पुढील 10 ते 12 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. मात्र, तत्पूर्वी त्यांना आमदारकीचा राजीनामा देऊनच भाजपमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर रोजी गोव्यात येत असून तत्पूर्वी गोव्यात राजकीय स्फोट घडवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. या आमदाराचा भाजपप्रवेश हाही त्याचाच एक भाग असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com