...म्हणून करण्यात आला आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा उद्‌घाटन कार्यक्रम रद्द!

कोट्यवधी रुपयांचा खर्च, वर्षभरापूर्वीपासूनचे नियोजन आणि देशभरातून आलेले पाहुणे असा थाटमाट असणाऱ्या भारताच्या सातव्या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे कालचे नियोजित उद्‌घाटन झालेच नाही.
Inauguration of International Science Festival canceled
Inauguration of International Science Festival canceled Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कोट्यवधी रुपयांचा खर्च, वर्षभरापूर्वीपासूनचे नियोजन आणि देशभरातून आलेले पाहुणे असा थाटमाट असणाऱ्या भारताच्या सातव्या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे (International Science Festival) कालचे नियोजित उद्‌घाटन झालेच नाही. सेनादलप्रमुख बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्युमुळे आजचा उद्‌घाटन कार्यक्रम (Inauguration) रद्द झाल्याची माहिती मेसेजद्वारे देण्यात आली. अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम नियोजनशून्य असावेत हे तितकीच वेदनादायी आहे.

Inauguration of International Science Festival canceled
डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर चार स्टार मानांकन

शिस्तीत वाढलेली विज्ञान भारती संस्था या कार्यक्रमाचे आयोजक असून केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, अंटार्क्टिका सेंटर आणि गोवा सरकार या संस्था या आयोजनात सहभागी झाल्या आहेत.

तब्बल 12 ठिकाणी होत असलेल्या या महोत्सवात कुठे काय आहे? याची माहिती सांगणारे फलक कार्यक्रम स्थळावर नाहीत. देशभर विज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने ‘विज्ञानाची निर्मितीचा उत्सव’ या उद्देशाने आणि देशाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने हा आंतरराष्ट्रीय महोत्सव 13 डिसेंबरपर्यंत पणजीत(Panjim) होत आहे. यासाठी देशभरातून शेकडो विज्ञान केंद्रे, हजारो शास्त्रज्ञ, संशोधक, कलाकार गोव्यात आले आहेत.

Inauguration of International Science Festival canceled
डिचोलीत मजुरांचा बेशिस्तपणा, रस्त्यावरच गर्दी, अपघाताचा धोका

विद्यार्थ्यांसाठी पर्वणी : या महोत्सवात विविध उपक्रम उपकरणाद्वारे मांडले आहेत. इको फेस्ट, फेस्टिव्हल ऑफ गेम्स- टॉईज, विज्ञान चित्रपट महोत्सव, विज्ञान साहित्य महोत्सव, पारंपरिक हस्तकला, सामाजिक संस्था आणि केंद्रांशी संवाद असे कार्यक्रम होत आहेत.

आज होणार उद्‌घाटन : या महोत्सवाचे उद्‌घाटन 10 डिसेंबर रोजी होणार होते. मात्र, आता ते 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि मान्यवर शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत होणार आहे.

कोठे काय?

हा विज्ञान महोत्सव 12 ठिकाणी होत आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कोणते कार्यक्रम होतील याची सविस्तर टिप्पणी कार्यक्रमस्थळी मुलांना आणि नागरिकांना मिळाली तर त्या त्या ठिकाणी पोहोचणे संबंधितांना सोयीचे होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com