Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: प्रचार संपला, आरोप सुरू! भाजपावर पैसे वाटपाचा आरोप

गोवा येथील केपे मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.

दैनिक गोमन्तक

गोवा येथील केपे मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. भाजपाचे (BJP) कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी केला असून यासंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, अद्याप पोलिसांकडून याबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही.

गोव्यात (Goa) प्रचारतोफा शनिवारी थंडावल्या असून सोमवारी मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वी राजकीय वातावरण तापल्याचे दिसते. केपे (Quepem) मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार एल्टन डिकोस्टा यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे उमेदवार चंद्रकांत कवळेकर (Chandrakant Kavalekar) यांचे कार्यकर्ते केपे येथील मतदारांना रात्री उशीरा पैसे वाटत होते, असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

याबाबतचे व्हिडिओ देखील काँग्रेसने (Congress) सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या व्हिडिओत काँग्रेसचे कार्यकर्ते दुचाकीचा पाठलाग करताना दिसत आहेत. दुचाकीवरील दोन जण भाजपाचे कार्यकर्ते असून ते मतदारांना पैसे वाटत होते, असा आरोप काँग्रेसने केला आहे. यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले आहेत. काँग्रेसने केलेल्या आरोपांबाबत पोलिसांकडून अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT