Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

पंतप्रधान मोदींचा सकाळीच फोन, म्हणाले...:मुख्यमंत्री सावंत

गोवा राज्यचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी ताळगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 15 वर मतदान केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वच मोठ्या राजकीय पक्षांनी त्यांना बहुमत मिळणर असल्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने केलेल्या विकासाच्या आधारे गोव्यात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार सत्तेवर येईल आणि स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न साकार करण्याला हातभार लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला होता. (Goa Assembly Election latest news)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबरोबर फोनद्वारे संवाद साधला. याबाबत बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, आज सकाळी पंतप्रधान मोदी यांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या. मला पूर्ण विश्वास आहे की भाजप गोव्यात 22+ जागा जिंकेल. भाजपने 10 वर्षात पायाभूत सुविधांचा विकास केला आहे. याचा आम्हाला 100% बहुमत मिळवण्यासाठी नक्कीच फायदा होईल.

गोवा राज्यचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई आणि त्यांच्या पत्नी रिता श्रीधरन यांनी ताळगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 15 वर मतदान केले. यावेळी माध्यमांशी बोलताना राज्यपाल (Governor) म्हणाले, सर्व ठिकाणी सुरक्षित आणि सुरळीतपणे मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. राज्यपाल यांनी गोव्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT