गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी बजावला मतदानाचा हक्क

पी.एस.श्रीधरन पिल्लई आणि त्यांच्या पत्नी रिता श्रीधरन यांनी ताळगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 15 वर मतदान केले.
P. S. Sreedharan Pillai
P. S. Sreedharan PillaiDainik Gomantak

पणजी: गोव्यात सकाळी सात वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राज्यातील 1722 मतदान केंद्रांवर लोक मतदान करणार आहेत. गोवा राज्यचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई आणि त्यांच्या पत्नी रिता श्रीधरन यांनी ताळगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 15 वर मतदान केले. (P. S. Sreedharan Pillai Goa Election Live Updates)

P. S. Sreedharan Pillai
Goa Assembly Election: गोव्यात मतदानाला झाली सुरुवात

यावेळी माध्यमांशी बोलताना राज्यपाल (Governor) म्हणाले, सर्व ठिकाणी सुरक्षित आणि सुरळीतपणे मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. राज्यपाल यांनी गोव्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

P. S. Sreedharan Pillai
V. Somanna: तुमचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून मी आमदार!

गोव्यात 1722 मतदान केंद्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) एकूण 11 लाख 64 हजार 994 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यामध्ये 5 लाख 62 हजार 790 पुरुष तर 5 लाख 93 हजार 968 महिला मतदार (Voters) आहेत. तर 4 तृतीयपंथीही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या 40 मतदारसंघांसाठी एकूण 587 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी 382 उमेदवारी अर्ज वैध ठरले तर, 153 अर्ज अवैध ठरले. यामध्ये 34 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे 301 उमेदवार आता रिंगणात आहेत. दक्षिण गोव्यातून 154 तर उत्तर गोव्यातून 156 उमेदवार भवितव्य आजमावणार आहेत. गोव्याच्या निवडणुकीत यंदा फक्त 26 महिला उमेदवारच निवडणूक लढवत आहेत. त्या तुलनेत 275 पुरुष उमेदवार निवडणुकीत (Election) उभे आहेत. यापैकी 68 उमेदवार हे अपक्ष आहेत.

निवडणुकीदरम्यान कोणताही चुकीचा प्रकार घडू नयेत यासाठी 81 फ्लाईंग स्कॉड त्याचबरोबर स्थानिक सव्र्हींलन्स टीम आणि गोवा पोलिस तैनात ठेवले आहेत. ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत अशा लोकांवर कारवाई केली आहे.

- कुणाल, मुख्य निवडणूक अधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com