Pratap Singh Rane Started Election Campaign Dainik Gomantak
गोवा निवडणूक

प्रतापसिंग राणेंनी प्रचाराचा नारळ फोडला

उमेदवारीवर ठाम राहिल्यास पर्ये मतदारसंघात रंगणार सासरे विरुद्ध सून असा राजकीय सामना

दैनिक गोमन्तक

पर्ये : ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग राणे यांनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रतापसिंग राणेंना याआधीच काँग्रेसने पर्ये मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र भाजपने त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पर्ये मतदारसंघातून आरोग्यमंत्री आणि भाजप नेते विश्वजीत राणेंना उमेदवारीचे संकेत दिले होते. मात्र भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विश्वजीत राणेंच्या पत्नी दिव्या राणे यांना पर्ये मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विश्वजीत राणे वाळपई मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. (Pratap Singh Rane News Updates)

प्रतापसिंग राणेंनी (Pratap singh Rane) आपल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे प्रतापसिंग राणेंची सुन दिव्या राणे भाजपचा प्रचार करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे प्रतापसिंग राणे काँग्रेसच्या (Congress) प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. जर प्रतापसिंग राणेंनी उमेदवारी मागे घेतली नाही, तर पर्ये मतदारसंघात सासरे विरुद्ध सून असा सामना पाहायला मिळणार आहे. प्रतापसिंग राणेंनी आपली पत्नी विजयादेवी राणेंसह पर्येतील भूमिका देवीचा आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

प्रतापसिंग राणेंनी निवडणूक लढवू नये, यासाठी भाजपकडूनही (BJP) शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे. गोवा सरकारने प्रतापसिंग राणेंना आजीवन कॅबिनेट मंत्रीदर्जा देत राजकारणातून निवृत्त होण्यास वाट मोकळी करुन दिली होती. इतकंच नाही तर विश्वजीत राणेंनी प्रतापसिंग राणेंना सन्मानाने निवृत्त व्हावे असा सल्लाही दिला होता. मात्र अजूनही प्रतापसिंग राणे आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचं चित्र आहे.

पी. चिदंबरम यांनी रविवारी प्रतापसिंग राणेंनी आपली उमेदवारी पर्ये मतदारसंघातून निश्चित करावी किंवा त्यांनीच काँग्रेसचा उमेदवार द्यावा असं आवाहन केलं होतं. लागलीच प्रतापसिंग राणेंनी आपला प्रचार सुरु केला असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्यास पर्ये मतदारसंघात सासरे विरुद्ध सून असा राजकीय सामना रंगणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Goa Live Updates: नीता कांदोळकर यांनी दिला सांगोल्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राजीनामा!

SCROLL FOR NEXT