गोवा विधानसभा निवडणूक (Goa Election 2022) येत्या फेब्रुवारी महिन्यातील 14 तारखेला होणार आहे. गोव्यात जवळपास सर्वच पक्षांनी आपआपल्या पक्षाच्या उमदवारांची यादी जाहीर केली आहे. आणि आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सपाटा गोव्यात सुरू झाला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी आज साखळी (Sanquelim) मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
"मी पुन्हा एकदा साखळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजप या मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने जिंकेल आणि मी साखळीतूनच पुन्हा निवडून येईन. मला माझ्या जनतेवर आणि कार्यकर्त्यांना विश्वास आहे. 2022 मध्ये आम्ही 22 पेक्षा जास्त जागांसह गोव्यात पुन्हा सत्तेत येणार आहोत," असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केला.
दरम्यान पणजी मतदारसंघातून उत्पल पर्रीकरांनीही यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आणि ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. "मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी हुकूमशाही आणि सूडबुध्दीची निती वापरुन लोकांचा छळ केला आहे. गेल्या 10 वर्षापासून त्यांनी नकारात्मक पध्दतीचे राजकारण गोव्यात केले आहे. त्यामुळे जनतेचे मन दुखावले गेले. गोव्यातील जनता या मुख्यमंत्री आणि भाजप सरकारला कंटाळली असून या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना घरी बसवण्यासाठी जनता सज्ज झाली आहे," असा दावा साखळी मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार धर्मेश सगलानी यांनी काल केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.