Pramod Sawant, Arvind Kejriwal and Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: गोव्याच्या राजकीय वर्तुळात महायुतीची शक्यता

मुरगाव तालुक्यात अटीतटीची लढत

दैनिक गोमन्तक

वास्को: गोवा विधानसभा निवडणुकीत एकाही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाला पूर्ण बहुमत प्राप्त होणार नसल्याचे संकेत मतदारसंघातून मिळू लागले आहे. यामुळे राज्यात युतीचे किंवा महायुतीचे सरकार स्थापन होणार यात अजिबात शंका नसल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

मुरगाव तालुक्यातही विधानसभा निवडणुकीत अशाच प्रकारचे चित्र दिसत आहे. वास्को,मुरगाव, दाबोळी, कुठ्ठाळीत उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत असून निवडून येणाऱ्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मताधिक्या मिळणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांत अटीतटीची लढतीची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

गोव्यात (Goa) पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एकाही राष्ट्रीय पक्षाबरोबर प्रादेशिक पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त होणार नसल्याचे राजकीय क्षेत्रातून बोलण्यात येत आहे. गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय पक्षाबरोबर प्रादेशिक पक्षांना युती किंवा महायुतीच्या मार्गाचा उपयोग करावा लागेल. यासाठी राज्यातील विविध पक्षांनी अपक्ष उमेदवाराना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. राज्यात मार्च महिन्यात स्थापन होणाऱ्या सरकार मध्ये अपक्ष आमदार म्हणून जिंकून येणाऱ्यांची चांदी होणार हे स्पष्टपणे दिसत आहे. कदाचित निवडून येणाऱ्या सर्व अपक्ष आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलण्यात येत आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत 2017 मध्ये मुरगाव तालुक्यातील जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत देऊन चारही मतदारसंघांत शंभर टक्के यश प्राप्त करून दिले होते. मात्र यंदा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 2017 सारखे चित्र दिसणारा नसल्याचे स्पष्टपणे मुरगाव तालुक्यातील जनतेकडून वर्तविण्यात येत आहे. मुरगाव मतदारसंघात भाजप, काँग्रेस मध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढत होणार यात अजिबात शंका नसल्याचे राजकीय विशेष तज्ञ बोलत आहे. दाबोळीत भाजप, काँग्रेस,आम आदमी पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) लढत होण्याची शक्यता असून येथे मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याने येथे कोण बाजी मारणार हे स्पष्ट पणे सांगता येत नाही.कदाचित दाबोळीत यंदा नवीन चेहरा लोकप्रतिनीधी म्हणून समोर येण्याचे दिसत आहे. वास्को सुद्धा भाजप, काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. कुठ्ठाळीत यंदा काँग्रेस, भाजपा,आम आदमी पक्ष (AAP),दोन अपक्ष, तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये लढत होत असल्याने कदाचित भाजप,आम आदमी पक्ष व एका अपक्ष आमदारा मध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता राजकीय तज्ञाकडून बोलण्यात येत आहे.यामुळे मुरगाव तालुक्यात यंदाच्या विधानसभा निवडणूकीचे वारे वेगळेच असणार असे पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT