BJP Leaders presenting manifesto  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपचे संकल्प पत्र जाहीर

संकल्प पत्रात 22 प्रमुख मुद्यांचा समावेश

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपले संकल्प पत्र जाहीर केले. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते हे संकल्प पत्र प्रसिद्ध करण्यात आले. या संकल्प पत्रात भाजपने 22 प्रमुख मुद्दे मांडले आहेत. यावेळेस गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant), गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आदी उपस्थित होते.

भाजपच्या संकल्प पत्रातील प्रमुख 22 मुद्दे खालीलप्रमाणे:

1. राज्यातील गृहिणींवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी आम्ही गोव्यातील प्रत्येक घराला तीन मोफत एल.पी.जी. सिलिंडर देऊ.

2. आम्ही पात्र कुटुंबांना महिलांसाठी 2% आणि पुरुषांसाठी 4% व्याजदराने गृहकर्ज देऊन तसेच निवासी भूखंड विकसित करून आणि उपलब्ध करून देऊन पुढील पाच वर्षात सर्व गोमंतकीयांसाठी चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देऊ.

3. आम्ही पुढील तीन वर्षांसाठी पेट्रोल व डिझेलवरील राज्यशुल्क वाढवणार नाही.

4. आम्ही मनोहर पर्रीकर कल्याण निधीची स्थापना करू, जो प्रत्येक पंचायतीसाठी 3 कोटीपर्यंतचा आणि प्रत्येक नगरपालिकेसाठी 5 कोटीपर्यंतचा समान विकासनिधी असेल, ज्यामुळे राहणीमान सुधारेल आणि पायाभूत सुविधांना चालना मिळेल.

5. गोव्यातील स्थानिक रहिवाश्यांना होमस्टे सुविधा देऊ इच्छिणार्‍यांना पाच लाखांचे बिनव्याजी कर्ज आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणारी होमस्टे योजना आम्ही सुरू करू.

6. आपल्या आस्थापनात स्थानिक युवकांना रोजगार देणार्‍या उद्योजकांना आम्ही रु.5000/- प्रति महिना रकमेची 100% ई.पी.एफ. व ई.एस.आय. सबसिडी उपलब्ध करून देऊ. तसेच राज्यात रोजगारी सुलभ व्हावी म्हणून रोजगार मेळावे आयोजित करू.

7. साहसी खेळ आणि समुद्र किनाऱ्याभोवती सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून अंतर्देशीय पर्यटन, वैद्यकीय पर्यटन आणि वारसा आणि आध्यात्मिक पर्यटनाच्या संभाव्यतेचा उपयोग करून आम्ही येत्या पाच वर्षात राज्यातील वार्षिक पर्यटकांच्या आगमनाची संख्या दुप्पट करू.

8. पर्यटन क्षेत्राला आणखी चालना देऊन आम्ही गोव्याला बैठका, संमेलने आणि प्रदर्शनांचे (MICE) आशियातील केंद्र बनवू.

9. सत्तेवर परतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत, आम्ही गोवा खनिज विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील खाणकाम पुनरुज्जीवित करू आणि पारदर्शक भाडेतत्त्वावर तसेच कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन करून लोहखनिज बॉक्सचा लिलाव हाती घेऊ.

10. पुढील पाच वर्षात राज्यातील बहुस्तरीय गरीबीचे आम्ही पूर्णपणे निर्मूलन करू, सामाजिक कल्याण लाभांची कालबद्ध उजळणी व लक्ष निश्चिती द्वारे आम्ही सर्वांच्या समृद्धीची खात्री करू. थेट लाभधारक हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे वितरण होईल याची आम्ही खात्री करु. आम्ही दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन दरमहा रु.3000 पर्यंत वाढवू.

11. पुढील वीस वर्षांत गोव्यातून भारतासाठी सुवर्णपदक विजेता घडविण्यासाठी आम्ही 'मिशन गोल्ड कोस्ट' (मिशन सुवर्ण किनारा) ची सुरुवात करू.

12. आम्ही राज्यात नवीन आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम आणि फुटबॉल अकादमी स्थापन करू आणि आगामी वर्षामध्ये फिफा- यु- 20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करू.

13. आम्ही आमच्या खालील सततच्या प्रयत्नांद्वारे, गोव्याला पुढील 10 वर्षात 50 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने विकासाच्या मार्गावर पुढे नेऊ.

14. आम्ही गोव्याचे आरोग्य आणि निरोगीपणाचे केंद्र म्हणून रूपांतर करू आणि महामारी नंतरच्या जगात एकत्रित कार्यासाठी आणि दूरस्थ कार्यचालनासाठी गोव्याला एक प्रमुख गतव्यस्थान बनवू.

15. आम्ही गोव्याला उच्च तंत्रज्ञान संशोधनासाठीचे केंद्र म्हणून विकसित करू.

16. गोव्यातील प्रत्येक युवा पदवीधारकाला शिकाऊ-प्रशिक्षण (एप्रेंटिसशिप) देऊन व प्रशिक्षण काळात रु.5000 चा स्टाईपॅन्ड (वेतन) देऊन जायोगे तो लाभदायक रोजगार प्राप्तीसाठीची कौशल्य आत्मसात करेल याकरिता आम्ही मुख्यमंत्री एप्रेंटिसशिप उपक्रमात सुधार घडवून आणू.

17. राज्य आरोग्यसेवेत आंतरराष्ट्रीय संरक्षक दर्जाचे उद्दिष्ट गाठेल व मुलांमधील खुंटलेली वाढ व कुपोषण हटवेल.

18. निर्यातभिमुख शेतकरी उत्पादन संघटनांना (एफ. पी. ओ.) राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन दुपटीने वाढविण्याच्या व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 10 लाख मदत करू. तसेच आम्ही गोव्यात 20 शीत- पेटी साठवण सुविधा (कोल्ड स्टोरेज) निर्माण करू.

19. राज्यातील मासेमारी उपक्रमाला पाठिंबा देऊन गोव्याला सीफूडचा देशातील आघाडीचा निर्यातदार बनवण्याचे आमचे ध्येय आहे.

20. महिलांना गोव्याचा विकास व समृद्धी यांचे समान भागीदार आणि लाभधारक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि पुढील 10 वर्षात महिला कर्मचारी सहभागिता वाढवण्याचे ध्येय ठेवून आम्ही एक सर्वसमावेशक कृती योजना विकसित करू. तसेच पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजकांना खास सुविधा देऊ.

21. राज्यातील महिलांना आधार म्हणून आम्ही, किफायतशीर अन्नासाठी अन्नपूर्णा कॅ‌ंटीन्स, नोकरदार महिलांसाठी अल्पकालीन निवास (शॉर्ट- स्टे होम्स) व केवळ स्वयं-सहाय्य गटां (एस एच जी) द्वारा तयार केलेलीच उत्पादने विकतील अशी दुकाने राज्यभरात स्थापन करू. प्रत्येक जी.टी.डी.सी. हॉटेलवर अशी खास दुकाने असतील.

22. आम्ही गोव्यासाठी जागतिक दर्जाचे पर्यावरणानुकूल वाहतूक सुविधा निर्माण करू. गोमंतकीयांचा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या राज्यांतर्गत प्रवासाचा वेळ एका तासापेक्षा कमी करण्यासाठी आम्ही पॅसेंजर व कार्गो वाहतुकीकरिता आंतर- भूभागीय जलमार्गाचा वापर करू.

संकल्प पत्र बनवताना आम्ही गोव्याच्या (Goa) नागरिकांकडून सूचना मागितल्या होत्या. आमच्या या आवाहनाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. लोकांनी विविध माध्यमातून आम्हाला 10000 हून अधिक सूचना दिल्या. आम्ही या सर्व सुचनांना विचारात घेऊन संकल्प पत्र तयार केले आहे, असे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT