Narakasura get sponsorship from Goa leaders Dainik Gomantak
गोवा निवडणूक

चर्चा पणजी मतदारसंघाची: ‘नरकासुराची रक्कम' हे पर्रीकर पुत्राचे प्रेम तर नव्हे?

महागाईच्या काळात आता नरकासुरांच्या प्रतिमा उभारण्याचे कामही खर्चिक झाले आहे. या नरकासूरांना गोव्यातील नेतेमंडळींकडून स्पॉन्सरशीप मिळते.

दैनिक गोमन्तक

महागाईच्या काळात आता नरकासुरांच्या प्रतिमा उभारण्याचे कामही खर्चिक झाले आहे. या नरकासूरांना नेतेमंडळींकडून ‘स्पॉन्सरशीप मिळते. सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असल्याने राजकीय नेतेही आपला डाव साधण्यासाठी खिसे मोकळे करतात. यात पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आघाडीवर आहेत. 20 हजार रुपंयापासून ते दीड लाखांपर्यंतची मदत ते सढळहस्ते करतात. यंदा मात्र बाबूश मोन्सेरात यांनी दिलेली रक्कम मळ्यातील काही मंडळींनी परत केली आहे. नरकासुरासाठी पारंपरिकरित्या मळा हा प्रसिद्ध आहे. येथील मंडळाने ही रक्कम परत करण्यामागेही राजकारण आहे. यामागे पर्रीकर पुत्राचे प्रेम तर नसावे ना.

नरकासुर बुडणार

वेधशाळेचा अंदाज यंदा नरकासुरांच्या मूळाशी बेतणार अशी चिन्हे असे दिसू लागली आहेत. नेहमीप्रमाणे हा अंदाज खोटा ठरू दे, असेच मागणे राज्यातील नरकासुरप्रेमी करू लागले आहेत. मात्र, सध्याचे ढगाळ वातावरण, दर संध्याकाळी गडगडाटासह पडणारा परतीचा पाऊस यंदा नरकासुर प्रतिमाची पाणी शिंपडून दृष्ट काढणार अशीच चिन्हे दिसू लागली आहेत. ंकाही वर्षांपूर्वी नरकचतुर्दशीच्या दिवशी भरपूर पाऊस प्रतिमा भिजल्या होत्या त्यांना जाळण्याऐवजी बुडवण्याची पाळी आली होती. यंदाचे वातावरण पाहिल्यास नरकासूर बुडणार की जळणार या संभ्रमात सर्वजण आहेत. ∙∙∙

मतदार बुचकळ्यात

शुभ दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व राजकारणी आपली कंबर कसून कामाला लागले आहे. आकर्षक आणि भले मोठे होर्डिंग्स लावून लक्ष वेधक शुभेच्छा देताना काहींनी आपला पक्ष सांगितला तर काहींनी पक्ष निशाणी लपविण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मंत्री रामराव देसाई हे यंदा कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा बेत करूनच आले आहे. तसे ते खासगीत सर्वांना भेटून जातात. मात्र, शुभेच्छा देताना आपला पक्ष कोणता हे अजूनही गुलदस्त्यात ठेऊन असल्याने मतदार बुचकळ्यात पडले आहे. रामराव चांगली लढत देणार हे नक्की असले तरी कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप कळत नसल्याने सामान्य मतदारांबरोबर भाजपा काँग्रेस उमेदवारही कासावीस झाले आहेत. रामराव देसाई यांच्या मनात काय दडलंय हे कळत नसल्याने सर्वांनाच हुरहूर लागून राहिली असली तरी पोस्टर बाजीत ते भाव खाऊन गेले आहेत.

देर आयें दुरूस्त आयें...

मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी अगोदर भाजपशी युतीबाबत बोलणी करण्यासाठी उत्सुकता दर्शवली, मात्र चोविस तास व्हायच्या अगोदर आपला थोडा गोंधळ झाला, असे म्हणून सारवासारव केली. वास्तविक भारतीय जनता पक्षाशी सध्या तरी युती करणे म्हणजे तसा आत्मघातच ठरणार आहे, असे सुदिनरावांचे निकटचे सल्लागार म्हणतात. कारण वाढती महागाई, इंधनाच्या दराचा वाढता आलेख आणि इतर बाबींमुळे राज्यातील भाजप सरकार सध्या अडचणीत सापडले आहे, अशा स्थितीत या अडचणीत भाग घेणे कोणत्याही अन्य राजकीय पक्षाला स्वारस्य वाटेल, असे वाटत नाही, ते सुदिनरावांनना सांगतात. मात्र सुदिनरावांचे शब्द कसे काय घसरले बुवा अशा प्रतिक्रिया कार्यकर्ते आणि मगो प्रेमींकडून व्यक्त होत आहेत. काही का असेना चोविस तासात दुरुस्त आये हमारे नेता, अशाच प्रतिक्रिया बहुतांश मगो कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत, हे महत्त्वाचे. ∙∙∙

लोबोंचे कार्यक्रम लांबणीवर!

कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी स्वत:च्या मतदारसंघातील तसेच तालुक्यातील अन्य मतदारसंघांतील काही कार्यक्रम सध्या लांबणीवर टाकले आहेत. त्यांच्या मतदारसंघात गेल्या सहा-सात वर्षांपासून दरवर्षी भव्य आकाशकंदील स्पर्धा आयोजित केली जाते. त्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांवर बक्षिसांची तसेच अन्य प्रकारच्या मानधनाची अक्षरश: मोठी खैरात केली जाते. दोन दिवसांपूर्वी ती स्पर्धा होणार होती; पण, अचानक ती पुढे ढकलून येत्या 14 रोजी ठेवली आहे. त्यांचे इतरही काही महत्त्वपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत लोबो पक्षांतर करणार असल्याने व त्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याने त्यांनी हे कार्यक्रम पुढे ढकलले असल्याचा सध्या कळंगूटमध्ये बोलबाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT