चर्चा गोवा राजकारणाची: कुंकळ्ळी रंगली ‘आप’च्या रंगात

निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय पक्षांचे मतदारांना जवळ करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न; वाचा चर्चा गोवा राजकारणाची एका क्लिकवर
Assembly elections approaching political parties are touring Goa
Assembly elections approaching political parties are touring GoaDainik Gomantak
Published on
Updated on

‘नडणी कशीय जाव कोण्णो बरो हालुक जाय’ अशी कोकणीत म्हण आहे. सध्या निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय पक्ष मतदारांना जवळ करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करीत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जाहिरात चांगली व्हायला हवी. जाहिरात करण्यात आपचा हात धरणारा एकही पक्ष नाही. सगळा कुंकळ्ळी बाजार आम आदमीचा जाहिरातीने रंगला आहे. निळ्या व सफेद रंगाने आम आदमीचे झाडू भींतीवर झळकायला लागले आहेत. आम आदमी पक्षाचे पीआरवाले स्मार्ट आहेत. एकदा निवडणुकीची आचारसंहिता लागली की, अशा जाहिराती करण्यात व भिंती रंगविण्यात बंधने येणार म्हणून त्यांनी आधीच हे काम करून घेतले आहे. इतर पक्ष मात्र उमेदवार घोषित करण्याची वाट पहात आहेत. आपने तयारी मात्र जय्यत केली आहे. ∙∙∙

ढवळीकरांचा ‘यू टर्न’

दररोज घोषणा, आश्‍वासने आणि युतीच्या चर्चा मतदारात रंगत असून नेते मंडळीकडून चित्रविचित्र पद्धतीने कोणत्याही चॅनेलचे रिचार्ज न करताही मनोरंजन होत आहे. काल परवापर्यंत भाजपशी युती म्हणजे आत्महत्या म्हणणारे ढवळीकर बंधु अचानक १२ जागांवर ठाम राहून युतीची भाषा करतात आणि दुसऱ्या दिवशी आपण तसे बोललोच नाही, पत्रकारांनीच वेगळा अर्थ काढला असे म्हणतात. सावईवेरे, पेडणे, फोंडा आणि पणजी वेगवेगळी वक्तव्ये गेल्या महिनाभरात त्यांनी केली. त्यामुळे नेमकी युती कोणाशी करणार? हा प्रश्‍न मतदारांना पडलेला असून कार्यकर्ते पुन्हा संभ्रमात आहेत. त्यांच्या निकटच्या व्यक्ती सांगतात, युती नाहीच होणार! परंतु भाजपाला तसा युतीचा विश्‍वास वाटतो? त्यांनी ढवळीकरांचे पाणी जोखलेय काय?∙∙∙

Assembly elections approaching political parties are touring Goa
गोव्यातली कुजबूज

राणे यांचे काय चाललेय?

तिकीट वाटपाच्या मुद्यावरून सगळ्याच पक्षांत सध्या ‘सावळा गोंधळ’ आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही असे वाटते, ते अन्य पक्षांच्या वाटेवर आहेत. विश्‍वजीत कृष्णराव राणे हे भाजपातले बंडखोर म्हणून परिचीत आहे. त्यापेक्षा ते भाजपावर नाराज आहेत. ते सोमवारी केजरीवालांच्या भेटीला गेले होते. बराच काळ ते पत्रकारांच्या कक्षात बसून होते. पत्रकारांनी त्यांना आपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्‍न विचारला असता, नाही केवळ भेटीसाठी आलो असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे अलिकडेच ते तृणमूलमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. पण ते आपच्या नेत्यांना भेटल्याने राणेंचे काय चाललेय, तेच कळेनासे झाले आहे. ‘आप’सुद्धा त्यांच्यावर खप्पा मर्जी आहे, अशी आतली बातमी आहे. ∙∙∙

‘पोस्‍टर फाडके’

‘गोंयची नवी सकाळ’ असा आशावाद दाखविणारे तृणमूल काँग्रेसचे बॅनर्स काहीजणांना एवढे खुपले की राज्‍यभर जणू ‘पोस्‍टर फाडके’चा छुपा अजेंडा सुरू झाला आहे. जिकडे पाहावे तिकडे ममता बॅनर्जींच्या पोस्‍टरचे विद्रुपीकरण उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. प्रचार करा, मात्र संयमाने, तरीही कुणाचातरी संयम ढळतोय. या पोस्‍टर्सचा काहीजणांना एवढा तिटकारा की बॅनर्स, पोस्‍टर्स अडगळीत कितीही असले तरी तीक्ष्‍ण वस्‍तूद्वारे चिंध्‍या चिंध्‍या करणे अज्ञाताने काही सोडले नाही. आश्‍चर्याची गोष्‍ट म्‍हणजे विशेषत: रात्रभर कर्तव्‍यदक्ष पोलिसांच्‍या नजरेतून हे कसे काय सुटले? एवढी पोस्‍टर्स फाडली, विद्रुप केली गेली, तरीही पोलिस काय झोपी गेले होते काय? दुसरे आश्‍चर्य म्‍हणजे ‘जय श्रीराम’ आणि ‘वेलकम गडकरीजी’ वगैरे वगैरे पोस्‍टर्स कशी काय अज्ञाताच्‍या नजरेतून कशी काय सहिसलामत सुटली, आश्‍चर्य नव्‍हे काय? ∙∙∙

Assembly elections approaching political parties are touring Goa
गोव्यातील ही खरी कुजबूज

नवा मंत्र कोणता?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मगोपला तीन किंवा चार त्या उपर एकही जागा नाही, अशी जी भूमिका घेतली आहे ती अमित शहा यांच्या सल्ल्यानेच अशी माहिती प्राप्त झाली आहे. नवी दिल्लीत आणि गोव्यात अमित शहांना गोव्याचे नेते भेटले, त्यावेळी काहींनी मगोपशी युती करण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यातील अनेकांना युती घडलेलीही हवी आहे. परंतु अमित शहांनी मगोपची ‘किंमत’ केवळ तीन ते चार जागा अशीच केली आणि याच तत्त्वावर कुणाला मगोपशी वाटेघाटी करायची असेल, तर कसा असा सल्लाही त्यांनी दिला. त्यामुळे आता मुख्यमंत्री किंवा भाजपा संघटनेचे नेते फारसे या युतीबाबत उत्साही नाहीत. तोच धागा पकडून ढवळीकरही युती करणे म्हणजे ‘आत्मघात’ या निष्कर्षावर आले आहेत. आता शेवटच्या टप्प्यात अमित शहा मगोपला वश करण्यासाठी असा कोणता मंत्र जपणार आहेत, ते फक्त दिल्लीश्वरांनाच माहीत. या ‘मंत्रा’चीही ढवळीकर आतुरतेने वाट पाहत आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com