Moreno Rebello

 

Dainik Gomantak 

गोवा निवडणूक

Goa Election: मोरेन रिबेलो पुन्हा काँग्रेस वाटेवर!

केवळ 20 दिवसातच भाजप पक्षाचा राजीनामा दिलेले कुडतरीचे माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो (Moreno Rebello) यांनी आज अपेक्षेनुसार आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: केवळ 20 दिवसातच भाजप पक्षाचा राजीनामा दिलेले कुडतरीचे माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो (Moreno Rebello) यांनी आज अपेक्षेनुसार आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कुडतरीचे काँग्रेस गट अध्यक्ष मिलाग्रीस फेर्नांडिस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. गोव्यात सुशासन केवळ काँग्रेस पक्षच देऊ शकतो याची खात्री पटल्यानेच आपण 20 दिवसातच भाजपचा त्याग करून पुन्हा काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या बरोबर भाजपात (BJP) गेलेले त्यांचे सहकारी आणि कुडतरीचे उपसरपंच सायमन बार्रेटो हेही हजर होते. रिबेलो यांच्या जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या पत्नी मिशेल रिबेलो आणि कुडतरी काँग्रेस गटाचे माजी अध्यक्ष मिलाग्रीस रोड्रिग्स हेही यावेळी उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी आपण पुन्हा काँग्रेस पक्षात यावे अशी गळ घातली आणि आपण ती मान्य केली असे रिबेलो म्हणाले. यावेळी बोलताना गट अध्यक्ष फेर्नांडिस यांनी आता कुडतरीत सर्व काँग्रेस सदस्य एकत्र येऊन पुन्हा या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

रिबेलो यांनी 10 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपात प्रवेश केला होता. मात्र रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काँग्रेस सोडल्यावर काल रिबेलो यांनी भाजपला राम राम ठोकला होता .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT