पणजी: माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मांद्रे मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. गेला महिनाभर ते आपल्या बूथ समित्यांवरील कार्यकर्त्यांच्या गाटीभेटी घेत आहेत.
मांद्रे (Mandrem) मतदारसंघात पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. मला डावलले गेल्यास मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवेन याबद्दल माझ्या मनात आता कोणाताही संदेह नाही, असे मत पार्सेकर यांनी आज (गुरुवारी) दै. गोमन्तकशी बोलताना व्यक्त केले. लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी आज आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांशी पुन्हा एकदा सल्लामसलत केली.
ते म्हणाले, मांद्रे मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे आणि विद्यमान स्थितीत लोकांनी मला गळ घातली आहे. पक्षाची अधिकृत उमेदवारी मला न मिळाल्यास भाजपचा (BJP) मांद्रे मतदारसंघात पराभव होऊ शकतो, त्याचा फायदा विरोधी पक्षांना मिळू नये, असे मला वाटत असल्याने मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.
सूत्रांच्या मते, भाजप पक्षश्रेष्ठींनी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून दयानंद सोपटे यांना पसंती दिली आहे. त्यांना मांद्रे मतदारसंघात प्रचार काम सुरू करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. भाजपा सत्तेवर आणण्यासाठी इतर पक्षामधून आलेल्या आमदारांची मदत झाली त्यामुळे त्यांना उमेदवारी आम्ही डावलू शकत नाही, अशी भूमिका हल्लीच गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केली होती. त्या अनुषंगाने मांद्रेमध्ये सोपटे यांची उमेदवारी नक्की झाली आहे.
अपशकुन करण्याचा परस्पर प्रयत्न करणार!
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व आमदार दयानंद सोपटे यांच्यामधील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. भाजपा नेत्यांनी त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा केलेला प्रयत्न वाया गेला. दोघांनीही अधूनमधून परस्परांविरुद्ध व्यक्तव्ये केल्यामुळे हे वैर न शमण्याच्या पातळीवर गेले असून, दोघेही येत्या निवडणुकीत (Election) परस्परांना अपशकुन करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहेत. पार्सेकर यांच्या मते, ते निवडणूक लढल्यास आणि ती जिंकल्यास भाजपलाच फायदा होऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.