MLA Alina saldhana enters in AAP

 

Twitter/AAP

गोवा निवडणूक

आमदार अलिना साल्डाना यांचा ‘आप’मध्ये प्रवेश!

भाजपच्या आमदार अलिना साल्डाना यांनी आपला राजीनामा देऊन आता ‘आप’मध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Elections: गोव्याच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. अशीच एक गोष्ट म्हणजे गोव्याचे अपक्ष आमदार रोहन खवंटे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या (BJP) आमदार अलिना साल्डाना (MLA Alina saldhana) यांनी सुद्धा आपला राजीनामा गोवा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. त्यांनी आज आप (AAP) पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश केला आहे. हा प्रवेश त्यांनी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत ही व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली.

पक्षप्रवेश केल्यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "मी राजीनामा दिला कारण दिवंगत माथनी साल्डाना त्या पक्षात सामील झाले होते, आणि त्यांच्या निधनानंतर मी त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकले, मात्र ती पार्टी आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. इथे गोव्याच्या जनतेचा विकास होणार नाही हे मला माहीत आहे. कारण पार्टी सर्व तत्त्वे विसरली आहे. आणि त्यामुळेच मी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. कारण 'आप' हा असा पक्ष आहे जो महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत आहे. जो सामान्य माणसांचा पक्ष आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आम्ही आम आदमी पक्षातर्फे महिलांच्या सबलीकरणावर आणि एकंदरीत विकासावर भर देणार आहोत. मला वाटते मी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय अत्यंत योग्य असून मी माझ्या निर्णयापासून खूश आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viswajit Rane Delhi visit: मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली अमित शहांची भेट, दिल्लीत बी. एल. संतोष, भूपेंद्र यादव यांच्याशीही चर्चा

Terrorist Hafiz Saeed: हाफिज सईदवर कधी कारवाई होणार? पत्रकाराच्या जळजळीत प्रश्नावर पाकिस्तानी PMची लाजिरवाणी पळापळ; भारताचा सज्जड दम ठरला खरा VIDEO

Health And Motor Insurance Price Cut: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! स्वस्त होणार हेल्थ आणि मोटर इन्शुरन्स; अवाजवी कमिशनला लागणार लवकरच ब्रेक

Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

SCROLL FOR NEXT