भाजप उत्पल पर्रीकरांना काँग्रेसच्या वाटेवर ढकलत आहेत का? Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाजप उत्पल पर्रीकरांना काँग्रेसच्या वाटेवर ढकलत आहेत का?

उत्पल पर्रीकर यांनी पणजीमधून निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्यापासून मोन्सेरात खचले आहेत.

Priyanka Deshmukh

भाजपचे (BJP) नामी नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर (Manohar parrikar) नेहमीच आपल्या कुटूंबियांना राजकारणापासून दूर ठेवायचे. परंतु गोवा विभानसभेच्या रिंगणात त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) मोठ्या उत्साहाने उतरले आहे. पणजीतील जनतेचा उत्पल यांना पाठींबा आहे. मात्र, पर्रीकर कुटूंबियांना मोठा झटका देणारी बातमी सुत्रांकडून येत आहे. पर्रीकरांचे पुत्र उत्पल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर (social media) जोरदार रंगत आहेत. असे म्हटले जात आहे की, उत्पल काँग्रेसमधून (Congress) आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरवात करू शकतात. आता विचार करायचे झाले तर भाजपने उत्पल यांना तिकीट जाहीर केले नाही. कारण बाबूश मोन्सेरात पणजी मतदार संघातील अनुभवी नेते उत्पल यांना टक्कर देण्यासाठी तयार असणार. आता बाबूश यांना तिकीट द्याचये की उत्पल यांना ही भाजपासाठी डोकोदुखी ठरणार आहे. गोव्यातील भाजपा पक्षाची सध्याची परिस्थिती लक्षात घेतली तर मनोहर पर्रीकर यांच्या विचारांची भाजप आता गोव्यात कार्य करतांना दिसत नाही. त्यामुळे उत्पल कॉंग्रेसच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा भाजपच घडवून आणत आहेत का? भाजपचेच उमेदवार आपली डोकेदुखी कमी करण्यासाठी उत्पल पर्रीकर यांना कॉंग्रसमध्ये ढकलत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

उत्पल पर्रीकर भाजप कार्यकर्त्यांच्या मागेच

उत्पल कमळ हातात धरून भाजपमधूनच पणजी मतदार संघात निवडून येणार का? त्यांना भाजप तिकीट देणार का? की उत्पल यांना तिकीट न देऊन भाजपची डोकेदुखी वाढणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण उत्पल पर्रीकर हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भेटणार असल्याच्या चर्चांना गोव्यातील राजकीय पातळीवर उधाण आले आहे. जुलै 2019 मध्ये उत्पल यांनी भाजपवर मोठी टिका केली होती. ज्याची राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा झाली होती. "मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राजकारणात जो विश्वासार्ह्य मार्ग निर्माण केला होता तो 17 मार्च ला त्यांच्या मृत्यूसोबतच समाप्त झाला," असे उद्गार उत्पल यांनी भाजपवर टिका करतांना काढले होते. त्याच्या तेव्हाच्या या वक्तव्यावरून असे स्पष्ट होते की गोव्यातील भाजप सत्ता आता पर्रीकरांच्या धोरणावर चालणारी सत्ता राहीली नाही.

उत्पल पर्रीकर भाजप कार्यकर्त्यांच्या मागेच

उत्पल पर्रीकर यांनी पणजीमधून निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्यापासून मोन्सेरात खचले आहेत. त्यामुळे भाजप उमेदवारीबाबत काय निर्णय घेतात याकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे. पणजीमधून मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात निवडणूक न लढविलेल्या बाबूश मोन्सेरात यांनी त्यांच्या निधनानंतर पणजीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा पराभव केला होता. कुंकळ्येकर यांनी पर्रीकरांच्या मार्गदर्शनाखाली मोन्सेरात यांना 2017 मध्ये पराभूत केले होते. तेव्हा पणजी मतदार संघात दोघात नाही तर तिघात लढत होणार का? भाजप घराणेशाहीला पाठींबा देणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या निवडणूकीत गोमंतकीयांना मिळतील.

"भाजपचे कटिबद्ध कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षांच्या आमदारांना भाजपमध्ये स्वीकारतील की नाही हे येणारा काळच सांगेल? माझ्या वडिलांच्या राजकारणाची वेगळी ओळख होती. मी ते पुढे नेण्यास तयार आहे. त्याचे परिणाम आव्हानात्मक असतील, पण मी त्यांना तोंड द्यायला तयार आहे," असे त्यावेळी उत्पल म्हणाले होते.

उत्पल पर्रीकर भाजप कार्यकर्त्यांच्या मागेच

मात्र आपण गोव्यातील आताच्या राजकीय परिस्थीतीचा विचार केला तर भाजपने कॉंग्रेसचे अकरा आमदार फोडले आणि त्यांना आपल्या पक्षात प्रवेशही दिला. आता भाजपच्या आमदारांची संख्या 27 झाली आहे. आणि पक्षाने केलेल्या विकासकामाच्या बळावर येणारी निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वासही मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या सगळ्या राजकीय घडामोडींदरम्यान उत्पल पर्रीकर हे राहूल गांधींची भेट घेणार अशी अफवा भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पसरवली की काय? गोव्याच्या राजकारणातील ही नवी खेळी आहे की काय असे अनेक प्रश्न सध्या गोव्यातील जनतेच्या मनात शंका निर्माण करत आहे. मात्र आपल्या वडीलांचा बालेकिल्ला असलेल्या पणजी मतदार संघातून निवडणूक लढवणारच आणि भाजप मलाच तिकीट देणार असे ठाम मत उत्पल यांनी जनतेपुढे आपल्या वाढदिनी व्यक्त केले आहे. एवढेच नव्हे तर उत्पल पर्रीकर यांनी आपल्या वाढदिनी गोव्यात महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभही केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT