दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये गेले असता त्यांना ऑटोवाल्यांना अनेकआश्वासने दिली. त्याचवेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी ऑटोवाल्यांसोबतचा संबंध जोडत चक्क ऑटो चालवला आहे, त्यामुळे त्यांना ऑटोवाल्यांचे दुःख समजते, असेही सांगितले आहे. त्यामुळेच त्यांच्या सरकारने वाहनधारकांसाठी विशेष योजनाही आखल्या आहेत. दरम्यान गोव्यातही आगामी काळात विधानसभा निवडणूक आहे आणि गोव्यातही आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी टॅक्सी आणि ऑटोचालकांवर प्रेमाचा वर्षाव केला आणि त्यांना मोठ मोठे आश्वासन दिलेत, तर उत्तराखंडमध्येही राजकीय पक्ष ऑटोचालकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. वैयक्तिकरित्या विशिष्ट समुदायाला आपल्या बाजूने जोडणे हा राजकीय पक्षांसाठी फायदेशीर सौदा असल्याचे सिद्ध होते.
ऑटो चालकांवर आश्वासनांचा भडीमार
पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश किंवा उत्तराखंड या सर्व राज्यांतील राजकीय पक्ष आजकाल छोट्या व्यापारी समुदायावर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या समुदायाकडे लक्ष केंद्रित करून त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे फक्त राजकीय दौऱ्यावर जात नसून तेथिल स्थानिकांशी संवाद साधत आहेत, विशेषत: ऑटो चालकांवर लक्ष केंद्रित करत आहेत, या विशिष्ट समुदायासाठी अनेक योजनाही सुरू करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये जाऊन ऑटोचालकांसाठी अनेक आश्वासने दिली. यादरम्यान लुधियानामध्ये एका ऑटोचालकासोबत त्यांच्या ऑटोमध्ये बसून केजरीवाल त्यांच्या घरी गेले आणि तेथेच जेवणही केले. गोव्यात देखील काही काही वेगळी परिस्थीती नाही. गोव्यातील टॅक्सी चालकांसाटी केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठीही तयार आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनीही ऑटो चालकांना पंजाबमध्ये कोणत्याही ऑटो किंवा टॅक्सी चालकाला कितीही रुपयांचा दंड माफ केला जाईल. ऑटोचालकांना सरकारकडून विशेष प्रमाणपत्र दिले जाईल, जे बघून कोणताही पोलिस त्यांना त्रास देणार नाही. इतकंच नाही तर चन्नी यांनी ऑटोचालकांशी त्यांचा थेट संबंध सांगत स्वत: ऑटो चालवला आहे, त्यामुळे त्यांना ऑटो चालकांच्या अडचणी चांगल्या प्रकारे समजल्याचंही म्हटलं आहे. गोव्यातही राजकीय पक्षांमध्ये ऑटोचालकांबद्दल अचानक प्रेम निर्माण झाले. अशीच स्थिती उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातही दिसून येत आहे.
खूप प्रॉब्लेम्स आहेत पण ऐकायला कोणी नाही
गोवा टॅक्सी ओनर्स असोसिएशनचे सरचिटणीस प्रकाश पुरखे सांगतात की, जे काही राजकीय पक्ष त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येतील, ते त्यात सहभागी होऊन मतदान करणार एवढेच नव्हे तर जनतेला अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहनही करणार. प्रकाश यांच्या मते, गोव्यातील एका मोठ्या वर्गाची उपजीविका टॅक्सी आणि पर्यटनावर चालते. राजकीय पक्षांनी यापूर्वी त्यांना कोणतीही आश्वासने दिली नव्हती, त्यामुळे त्याची अंमलबजावणी होणे दूरच राहीले. परिणामी गोव्यातील टॅक्सीचालक अजूनही सर्व प्रकारच्या समस्यांशी झगडतच आहेत.
निवडणुकीत राजकीय पक्षांना फायदा
सरकारांनी त्यांच्यासाठी योजना बनवल्या आहेत मात्र आता राजकीय पक्ष हायपर लोकल बनून अती दुर्गम भागात जावून लहान व्यावसायिक आणि रोजंदारीवर कमावणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याचा फायदा नेहमीप्रमाणे राजकीय पक्षांनाच होतो. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार ज्या योजना बनवते, त्या बहुतांश योजना लोकांच्या उत्पन्नानुसार राबिविल्या जातात. अशा परिस्थितीत रोजचे कमावणारेही त्या योजनेत सामील होतात. ज्यामध्ये ऑटो चालक, रस्त्यावरील फळ-भाजी विक्रेते सर्व लहान आणि अत्यंत निम्न वर्गातील व्यापारी देखील सामील आहेत. पण आता राजकीय पक्षांनी विशेष लक्ष केंद्रित करून आणि रस्त्यावरील विक्रेते आणि टॅक्सी चालकांसाठी योजना राबविण्यास सुरुवात केली. जेव्हा सरकार किंवा एखादा पक्ष सर्वांसाठी एकत्रितपणे योजना अमंलात आणतो आणि जेव्हा ते वैयक्तिकरित्या एका समूहासाठी योजना तयार करता या दोन्ही गोष्टीमध्ये मोठा फरक असतो आहे. वैयक्तिकरित्या तयार केलेल्या योजना थेट एका विशिष्ट समुदायाला आकर्षीत करते. त्यामुळे राजकीय पक्ष केवळ ऑटो-टॅक्सीवाल्यांसाठी थेट योजना करून त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे आता या सगळ्याचा ऑटो-टॅक्सीवाल्यांना फायदा होणार की ही अश्वासने निवडणुकीत नंतर हवेतच विरुन जाणार ते येणारा काळच ठरवेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.