Randeep Surjewala Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात भाजपचे अनेक नेते कॉंग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत पण...: सुरजेवाला

सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक पक्षाने कॉंग्रेसच्या उमेदवारांना समर्थन द्यावे. गोव्याच्या स्वातंत्र्यापासून कॉंग्रेस पक्ष राज्याचा विकासासाठी काम करत आहे. आम्हाला खात्री आहे की, गोव्यात कॉंग्रेसचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास कोंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पणजीतील (Panaji) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (Randeep Surjewala Congress)

सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, गोव्यासह (Goa) देशभरात 60 लाख सरकारी नोकर्‍यांची पदे रिक्त आहेत. ती न भरून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने शिक्षित युवकांचा विश्वासघात केला आहे.

महिलांची (Women) सुरक्षा या मुद्द्यावर बोलताना सुरजेवाला यांनी भाजपवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियानासाठी मंजूर निधी मधील 79% निधी हा भाजपने जाहिरातींवर खर्च केला आहे. या सरकारची धोरणे महिला आणि युवाविरोधी आहेत.

पक्षांतरवर बोलताना सुरजेवाला म्हणाले, भाजपने अनेक नेते कॉंग्रेस पक्षात येण्यास इच्छुक आहेत. मात्र अशा पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना उमेदवारी देण्यापेक्षा आम्ही तरुण चेहऱ्यांना, महिलांना संधी देत आहोत.

दरम्यान, सुरजेवाला यांनी अरविंद केजरीवाल यांना 'निवडणूक पर्यटक' असे संबोधले. ते म्हणाले बाहेरून आलेले पक्ष गोव्याचा विकास करू शकत नाहीत. गोव्याचा विकास करण्यासाठी पर्यटन व्यवसायावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कॉंग्रेस लोकांसाठी काम करेल आणि गोव्याला स्थिर सरकार देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT