BJP is everywhere in state Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election 2022: राज्यात भाजपचाच बोलबाला

थिवीमध्ये माजी आमदार नीळकंठ हळर्णकर हे निवडणूक हरणार

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्‍हाडगुत

पणजी: निवडणुकीपूर्वी राज्‍यात भाजपविरोधी वातावरण असल्याचा प्रचार झाला असला तरी निकालानंतर भाजपच सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी भाजपने अनपेक्षित धक्के दिले आहेत. भाजपचे बहुतेक मातब्बर उमेदवार जिंकले असून काही जिंकण्याच्या मार्गावर आहेत.

थिवीमध्ये माजी आमदार नीळकंठ हळर्णकर हे निवडणूक हरणार व तृमणूलच्या कविता कांदोळकर या जिंकणार अशी हवा होती. पण तिथे हळर्णकर यांचेचे बल्लेबल्ले झाले. तसेच पणजीत मनोहर पर्रीकर पुत्र उत्पल हे पणजीचे आमदार बाबूश मान्सेरात यांना धक्का देणार असे वाटत होते.

पण बाबूशने आपला किल्ला राखला. मुरगावात मात्र माजी मंत्री मिलिंद नाईक यांचा अपेक्षेप्रमाणे पराभव झाला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे उपमुंख्यमंत्री बाबू कवळेकर यांचा केपेत झालेला पराभव. केपे हा बाबूंचा अभेद्द गड गणला जात होता. पण काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यामुळे बाबूंना हा गड गमवावा लागला. मडगावात स्थलांतर झालेले दुसरे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा पराभव तसा अपेक्षितच होता. यामुळे दोघेही उपमुख्यमंत्र्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. तसेच चर्चिल आलेमाव व त्यांची कन्या वालांका यांचाही पराभव झाला आहे. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांनाही पराभवाचे तोंड पहावे लागले.

हे पाहता कॉँग्रेसची रणनीती अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गोवा फारवर्डबरोबर युती करुनही त्यांच्या पदरात विशेष काही पडल्याचे दिसत नाही. त्यामुळे यावेळीही कॉँग्रेसला परत एकदा विरोधी बाकावर बसावे लागणार हे निश्‍चित झाले आहे.

याबाबतीत बोलताना गोवा फॉर्वडचे मोहनदास लोलयेकर यांनी कॉँग्रेसने युती करण्याच वेळ काढला म्हणून ही परिस्थिती आली असे म्हटले. गोवा फॉर्वडचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई हे जरी निवडून आले असले तरी पक्षाला व युतीला त्याचा विशेष फायदा झाला असे दिसत नाही.

त्यामानाने मगो पक्षाने बऱ्यापैकी बाजी मारली असे म्हणावे लागले. काही मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारांनी चांगली मते प्राप्त केल्याचे दिसून आले आहे. आता प्रश्न येतो तो मगो पक्ष भाजपजवळ युती करणार की नाही याचा. डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यास मगोप भाजपबरोबर युती करणार नाही असे मगोपचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी जाहीर केले होते. आता ते आपला शब्द पाळतात की काय हे बघावे लागेल.

पण कोणत्याही परिस्थितीत आता गोव्यात भाजपचेच सरकार येणार हे निश्चित झाले आहे. निकालपूर्व सर्वेक्षणाचे अंदाज खोटे ठरल्याचे दिसून आले असून कॉँग्रेस निकालाच्या दिवशी पाच वाजता सरकार स्थापनेचा दावा करणार असे जे सांगितले गेले होते ती आता एक कहाणीच ठरणार आहे एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT