BJP win
BJP windainik gomantak

पैशांच्या आमिशाला बळी पडली नाही सांगेची जनता: सुभाष फळदेसाई

सांगे मतदारसंघातून आपला पराभव करण्यासाठी सावित्री कवळेकर यांनी पाण्यासारखा पैसा ओतला.
Published on

केपे: सांगे मतदारसंघातून आपला पराभव करण्यासाठी सावित्री कवळेकर यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. पण, सांगेतील सुजाण मतदार पैशाला बळी न पडता त्यांना हवा असलेला आमदार निवडून दिला, असे सुभाष फळदेसाई यांनी विजय झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

पैशाचा जोरावर मतदारांना विकत घेऊन आपला विजय होणार असे जर कुणालाही वाटत असेल तर त्याला सांगेवासीय मतदानातून उत्तर देण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

BJP win
गोव्यात 'भाजप'चाच बोलबाला; कॉंग्रेसचा धुव्वा

बाबू कवळेकर यंच्याविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले की आपले अनेक कार्यकर्ते केपे मतदारसंघात आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी मी प्रयत्न केला असता तर त्यांना आपली अनामत सुद्धा सांभाळता आली नसती. सावित्री कवळेकर यांनी पैशांच्या बळावर अनेक कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या काही प्रमाणात यशस्वी ठरल्या. पण, निस्वार्थ भावनेने काम करणारे कार्यकर्ते आमिषाला बळी पडले नाहीत.

सांगेतील भाजपाचा विजय हा लोकांचा तसेच लोकांना मी दिलेल्या सेवेचा असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. सांगे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय असून त्यादृष्टीने आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

BJP win
फोंडा तालुक्‍यात भाजपचे वर्चस्‍व

सांगेला मंत्रिपद मिळावे!

सांगे मतदारसंघाला बऱ्याच वर्षांपासून मंत्रिपद लाभलेले नसल्याने मतदारसंघाचा विकास हवा तसा झालेला नाही. यासाठी यावेळेलातरी सुभाष फळदेसाई यांना मंत्रिपद देऊन सांगे मतदारसंघातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी लोकांतून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com