Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

संधी मिळाल्यास गोव्यात सरकार स्थापन करणार: मायकल लोबो

मायकल लोबो आणि दिगंबर कामत पणजी काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: आठवडा उलटून गेला तरी भाजपने सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केलेला नाही. त्यामुळे राज्यपालांनी बघ्याची भूमिका न घेता या वेळकाढूपणाबाबत गंभीर विचार करण्याची गरज आहे. संधी मिळाल्यास कॉंग्रेस सरकार स्थापन करण्यास तयार आहे, असे कॉंग्रेस (Congress) नेते मायकल लोबो म्हणाले. मायकल लोबो आणि दिगंबर कामत पणजी काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

दिगंबर कामत म्हणाले, ज्या पद्धतीने सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे त्यावरून प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहे. मतमोजणीनंतर दोन दिवसांत राज्यात सरकार येईल असे वाटत होते. भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी अपक्ष व इतर पक्षाने पाठिंबा दिला होता. शिमगा झाला तरी सरकार स्थापन होत नाही व त्याबाबतच्या हालचालीही होत नाही. त्यामुळे भाजपविरोधी आमदार व अपक्षानी याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे.

कामत पुढे म्हणाले, सरकार स्थापन झाले नसताना आमदारांना सभापतीपदी नियुक्त केलेल्या आमदाराकडून शपथा देण्यात आल्या. गोव्याच्या (Goa) विधानसभेतील ही अशी पहिलीच घटना आहे

सरकार स्थापनेबाबत होत असलेल्या विलंबाचा काँग्रेसने निषेध केला आहे. घटनेच्या कलम 356 नुसार सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला सरकार स्थापनेस सांगावे. अजूनही सरकार स्थापन होत नसल्याने राज्यातील लोकांवरील हा अन्याय असल्याची टीका काँग्रेसने केली. सरकार स्थापनेस संधी मिळाल्यास ती घेण्याची तयारी काँग्रेसने ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: भारतातच नाही तर थेट बलोचमध्येही 'खन्नाची हवा'; दिग्गज नेते झालेत फॅन, म्हणाले "हा तर हुबेहूब..."

अग्रलेख: हडफड्याच्या अग्निकांडाचा उगम कझाकस्थानात? कझाकी नर्तिकेचं नृत्य नसतं तर क्लबला आग लागली नसती?

'बासमती' नुसता बहाणा! ट्रम्प यांच्या आयात शुल्कवाढीमागे अर्थकारण कमी, अहंकारच अधिक - संपादकीय

Amazon Investment In India: भारतात 35 अब्ज डॉलर गुंतवणूक, अमेझॉनची घोषणा; देशात 10 लाख नोकऱ्या निर्माण होणार

Goa Live News: "मी फक्त 'गुंतवणूकदार"- 'बर्च'चा भागीदार अजय गुप्ताचा दावा

SCROLL FOR NEXT