Congress Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: म्हापशात काँग्रेसजनांच्या आशा पल्लवीत

‘सायलंट वोटिंग’चा फटका भाजपला बसण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

म्हापसा: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत म्हापसा मतदारसंघात बऱ्यापैकी मतदान झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत ही टक्केवारी 43.41 टक्के तर अखेरीस ती टक्केवारी 77.43 पर्यंत पोहोचली. मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे म्हापशातील काँग्रेसजनांच्या आशा सध्या पल्लवित झाल्या असून, मोठ्या प्रमाणात झालेल्या ‘सायलंट वोटिंग’चा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

मागच्या पोटनिवडणुकीत जोशुआ डिसोझा यांना 11,167 मते तर, सुधीर कांदोळकर यांना 10,016 मते मिळून 1,151 मतांची आघाडी घेऊन जोशुआ डिसोझा विजयी झाले होते. असे असले तरी यंदाच्या एकंदर मतदानावरून काँग्रेस उमेदवार सुधीर कांदोळकर यांच्या दृष्टीने आशादायक परिस्थिती आहे. मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश कांदोळकर यांना या खेपेस खूपच लाभदायक ठरलेला आहे.

तृणमूलचे तारक आरोलकर व ‘आप’चे राहुल म्हांबरे यांनी मोठ्या प्रमाणात मते मिळवली, तर मात्र भाजपच्या दृष्टीने ते पोषक ठरू शकते. म्हापशातील बहुतांश भागांत कांदोळकर यांनाच मतदारांचा प्रतिसाद लाभला असे, दिसून आले.

मी विजयी होणारच: जोशुआ डिसोझा

आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले, माझे दिवंगत वडील तथा म्हापशाचे माजी आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीदिवशी हे मतदान होत आहे, हा माझ्या दृष्टीने भाग्याचा योग आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी अजूनही दिवाळी बोनसच्या प्रतीक्षेत

Ranji Trophy: गोवा सलग चौथा विजय मिळवणार का? मिझोरमविरुद्ध पारडे जड; नवीन चेहऱ्यांना संधी

'Cash For Job Scam' केसमधील 'हाय-फाय प्रियाचे' कारनामे होणार उघड! अनेक महिलांकडून उकळले पैसे

Russian in Goa: रशियन आले हो! हंगामाच्या पहिल्या चार्टरने 334 पर्यटक गोव्यात दाखल

'Cash For Job Scam'चे आणखी एक प्रकरण उघड! निवृत्त नौदल कर्मचाऱ्याच्या मुलाकडून 6 लाख उकळले

SCROLL FOR NEXT