पणजी: सोमवारी गोव्यात विधानसभा निवडनुकीचे मतदान पार पडले. रणरणत्या उन्हात रांगेत उभे राहून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यात काल 78.94% मतदान झाले. मतदानानंतर सर्वांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र, त्यासाठी 10 मार्च पर्यंत थांबावे लागणार आहे.
या मधल्या काळात सर्व राजकीय पक्ष बहुमत मिळण्याचा दावा करणार यात शंका नाही. मतदानाच्या टक्केवारीवर भाष्य करताना कॉंग्रेस (Congress) नेते म्हणाले, लोकांनी सत्तापालट करण्यासाठी भरभरून मतदान केले आहे. कॉंग्रेसला गोव्यात बहुमत मिळेल याची आम्हाला खात्री आहे.
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी (Election Incharge) कुणाल यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करत जनतेशी संवाद साधला. त्यानी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी एकूण 301 उमेदवार उभे होते; त्यापैकी 275 पुरुष आणि 26 महिला उमेदवारांचा समावेश होता. राज्यात एकूण 1722 मतदान केंद्रे होती. राज्यात 78.94% मतदान झाले. यापैकी सर्वाधिक मतदान हे साखळी मतदारसंघात (Sanquelim) झाले असून सर्वात कमी मतदान बाणावली मतदारसंघात (Benaulim) झाले. त्याचबरोबर उत्तर गोव्यात एकूण 79.84% तर दक्षिण गोव्यात 78.15% मतदान पार पडले.
पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार म्हणाले की, मतदान शांततेत पार पडले असले तरी मतदानादरम्यान काही तक्रारी नोंद झाल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.