Goa politics : Goa Congress Party Dainik Gomantak
गोवा निवडणूक

काँग्रेसने अखला गोव्याचा पुढील 25 वर्षाच्या 'विकासाचा आलेख'

खलप : डॉक्टर, वकील, अभियंत्यांची घेतली मते, दीर्घ विकासाचे नियोजन

दैनिक गोमन्तक

पणजी: निवडणूक जाहीरनामा (Goa Politics) भविष्यातील पक्षाची दिशा ठरवत असतो. त्यामुळे दीर्घ अभ्यास आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची मते जाणून घेऊन काँग्रेस पक्षाचा (Goa Congress Party) जाहीरनामा तयार केला जात आहे. जो गोव्याच्या अस्मितेचा विचार करणारा आणि गोमंतकीयांच्या पुढील 25 वर्षाच्या विकासाचा असेल, अशी माहिती काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष रमाकांत खलप यांनी दिली.

राज्याच्या विधानसभा 2022 निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याला विशेष असे स्थान असते. काँग्रेस पक्षाने माजी केंद्रीय कायदा मंत्री खलप यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. ते स्वतः इतर पाच सहकाऱ्यांना घेऊन गेली दोन महिने या जाहीरनाम्यावर काम करत आहेत. या जाहीरनाम्याच्या मसुद्याचे काम पूर्ण झाले असून, त्याला कार्यकारी समितीची मंजुरी घेऊन लोकांसमोर मांडला जाईल. यात गोमंतकियांची अस्मिता जपत मूळ गोव्याचे दर्शन होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नियोजन करताना या शतकाचा विचार असावा, असा आग्रह धरून विधानसभेत मजूर होणारे कायदे, भावी पिढीसाठी कल्याणकारी असावेत याकडे लक्ष दिले जात आहे, असेही खलप म्हणाले .

प्रत्यक्ष भेटी, चर्चेवर भर

राज्यात दीर्घकाळ सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष गेली दहा वर्ष विरोधात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये पक्षाला बहुमत मिळेल या उद्देशाने हा जाहीरनामा तयार केला आहे. यासाठी डॉक्टर, वकील, अभियंता, शिक्षक, पर्यावरणप्रेमी, समाजसेवक आदींची लेखी आणि प्रत्यक्ष भेट घेऊन मते जाणून घेतली आहेत. त्याचा छाप या जाहीरनाम्यात दिसेल.

पर्यटन, शेती विकास आणि शिक्षणाला महत्त्व

राज्याच्या विकासामध्ये पर्यटनाला अनन्यसाधारण महत्त्व असून पुढील पंचवीस वर्षांमध्ये त्याची दिशा काय असेल, यासाठी त्या जाहीरनाम्यामध्ये विशेष स्थान दिले आहे. शेती विकास, शिक्षण, पर्यावरण, उद्योग यांनाही जाहीरनाम्यात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जाहीरनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे खलप म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT