आपल्या उपासनगर येथील कार्यालयातून कामगिरी पत्रक 2012 ते 2022 या पुस्तिकेचे अनावरण आपचे सिद्धेश भगत यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यात एलिना साल्ढाणा (Elena Saldhana) यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात कुठ्ठाळी मतदारसंघात (Kuthali constituency) केलेल्या विविध विकासकामांचा लेखा-जोखा आणि कार्याचा आढावा फोटोसहित नमूद केला आहे. यात रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण, संरक्षक भिंतीचे कामकाज, क्रीडा संकूल, मार्केट संकुल, नाले व बांधकाम, पाण्याच्या नवीन वाहिनी बसवणे तसेच इतर विकास कामाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत साल्ढाणा यांनी आपल्या विकासकामांच्या पुस्तिकेचे अनावरण करताना आनंद वाटत असल्याचे सांगितले. आपचे (AAP) सिद्धेश भगत उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या की, या कामगिरी पत्रक 2012 ते 2022 या पुस्तकामुळे आपल्या विकास कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. तसेच स्थानिक कलाभवनचे काम चालू असून तेही लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
साल्ढाणा यांनी त्यांच्या विरोधकांवर आरोप करतांना म्हणाल्या की, यात भलतेच लोक ही विकासकामे आम्हीच केली असे सांगून धुसफूस करतात. गेल्या दहा वर्षापासून मी माझी विकासकामे चालू ठेवली आहे आणि आजही चालूच असल्याचे त्या म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.