TMCचा सर्वाधिक फायदा BJPला! संजय राऊतांचे दीदींना खडे बोल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या कार्यशैलीचं नेहमी कौतुक करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील राजकारणावरुन त्यांच्यावर टीका केली आहे.
sanjay raut criticize tmc and attack on mamata banerjee
sanjay raut criticize tmc and attack on mamata banerjee Dainik Gomantak

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या कार्यशैलीचं नेहमी कौतुक करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील राजकारणावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी "काँग्रेसविरोधी" भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी तृणमूल काँग्रेसवर आणि ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. सोबतच किनारी राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या उपस्थितीचा भाजपलाच सर्वाधिक फायदा होईल, असा दावाही राऊत यांनी केला.

sanjay raut criticize tmc and attack on mamata banerjee
गोवा निवडणुकीत अपक्षांची भूमिका काय असणार?

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' मधील 'रोखठोक' या साप्ताहिक स्तंभात संजय राऊत यांनी ही भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेस गोव्यातील काँग्रेसपक्षासह इतर पक्षांमधील "अस्थिर नेत्यांना" समाविष्ट करत आहे आणि अशी वृत्ती भाजपला टक्कर देणाऱ्या ममता बॅनर्जी यांना शोभत नाही. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी टीएमसी प्रचंड खर्च करत आहे आणि अनेकांचे म्हणणे आहे की पक्षाने खर्च केलेल्या पैशाचा स्रोत कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आहे. गोव्यातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत राऊत यांनी सर्व पक्षांनी गोव्याला ‘राजकीय प्रयोगशाळा’ बनवले अशी टिकाही त्यांनी केली आहे.

गोव्यातील सर्व 40 विधानसभा जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने काल केली. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (BJP), काँग्रेस (Congress), गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP), महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी (MGP), आम आदमी पार्टी (AAP), टीएमसी (TMC), शिवसेना (ShivSena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) यावर्षी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्या पार्श्वभुमीवर राऊत यांनी सर्वच पक्षांनी गोव्याला राजकीय प्रयोगशाळा बनवली असल्याची टीका करत हे भाष्य केले आहे.

sanjay raut criticize tmc and attack on mamata banerjee
जाणून घ्या गोव्यातील पक्षांचे आगामी निवडणुकीताल भविष्य?

राऊत पुढे म्हणाले, गोव्यात टीएमसीच्या उपस्थितीचा भाजपला सर्वाधिक फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे उद्दिष्ट काँग्रेसचे अस्तित्व पुसून टाकणे असेल तर ते समजण्यासारखे आहे, पण बॅनर्जी यांचेही तेच उद्दिष्ट असेल तर ते त्यांच्या प्रतिमेला शोभणारे नाही. गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता आणि आता तो फक्त दोन जागांवर येवून ठेपला आहे, असे म्हणत राऊत यांनी कॉंग्रेसबद्दल खंतही व्यक्त केली आहे. गोव्यात काँग्रेसकडे तगडे नेतृत्व नाही, तरीही गोव्याची निवडणूक जिंकणे भाजपसाठी सोपे नाही, परंतु आप आणि टीएमसीसारखे पक्ष भाजपला मदत करण्यासाठी काँग्रेसच्या मार्गात अडथळे आणत आहेत, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com