Bjp Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Exit Poll 2022 : 'गोव्यात भाजप स्वबळावर सरकार बनवणार'

विधानसभा निवडणूक 2022 (Assembly Election 2022) अंतर्गत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोव्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडले आहे. विधानसभा निवडणूक 2022 अंतर्गत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोव्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यासोबतच उत्तराखंड (Uttarakhand), मणिपूर, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि पंजाबमध्ये नवीन विधानसभा आणि सरकारे निवडली जातील. गोव्यात (Goa) पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने (BJP) पूर्ण ताकद पणाला लावली आहे. (Goa BJP state president Sadanand Shet Tanawade has said that BJP will form a government on its own)

दुसरीकडे, भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र आता गोव्याच्या जनतेने आपल्या मतदानाच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला बहुमत दिले आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पाश्वभूमीवर गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी राज्याचा विकास आणि प्रगतीसाठी गोव्याच्या जनतेने भाजपला मतदान केले असल्याचा दावा केला आहे.

तसेच, गोवा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार चर्चिल आलेमाओ, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत, भाजप नेते रवी नाईक, अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी मुख्यमंत्री विजय सरदेसाई यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत यंदाची लढत चुरशीची आहे. सत्ताधारी पक्ष भाजपला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांचे कडवे आव्हान आहे. मतदानानंतर सीएम प्रमोद सावंत यांनी विजयाचा दावा केला असून आम्हाला विश्वास आहे की, 'आम्ही 22 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सरकार स्थापन करु.'

एक्झिट पोलबाबत मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?

भारतामध्ये 1998 मध्ये प्रथमच एक्झिट पोलबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने कलम 324 अन्वये, 14 फेब्रुवारी 1998 रोजी संध्याकाळी 5 ते 7 मार्च 1998 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलचे निकाल प्रकाशित करण्यास किंवा प्रदर्शित करण्यास मनाई केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

SCROLL FOR NEXT