Goa Assembly 2022 Independent MLA Rohan Khanwate joins BJP

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

2022 मध्ये भाजपच जिंकणार हे निर्विवाद सत्य: रोहन खंवटे

रोहन खंवटे : दिल्लीत जे. पी. नड्डांची घेतली भेट

दैनिक गोमन्तक

पणजी Goa Assembly 2022: बहुप्रतिक्षीत पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी काल (शुक्रवारी) सकाळी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खंवटे यांनी संध्याकाळी दिल्ली गाठत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P Nadda) यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाचे सोपस्कार पूर्ण केले. यावेळी त्यांच्यासमवेत गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

माझ्यावर पक्षाने जो विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला आपण पात्र ठरणार आहोत. आता भाजप व आपल्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. असतील तर ते विसरून पर्वरीच्या आणि गोव्याच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगून 2022 मध्ये भाजपच जिंकणार हे निर्विवाद सत्य असल्याचे रोहन खंवटे (M.L.A.Rohan Khaunte) यांनी सांगितले.

पणजीच्या भाजप (BJP) कार्यालयासमोर आज सकाळी पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार ग्लेन टिकलो, बाबूश मोन्सेरात, गुरुप्रसाद पावसकर, पर्वरी मतदार संघाच्या भाजप मंडळाचे सरचिटणीस अशोक शेट्टी, भाजपाचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, पर्वरीतील तिन्ही पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच आणि रोहन खंवटे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी, कार्यकर्त्यांसह खंवटे यांनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. आज भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दीड महिन्यापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवत 15 दिवसांपूर्वी या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देवून आता ते भाजपात दाखल झाले आहेत.

‘आप’, तृणमूल औटघटकेचे पाहुणे : फडणवीस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेससह आप आणि तृणमूल पक्षावर जोरदार टीका केली. आप आणि तृणमूल हे औटघटकेचे पाहुणे असून ते निवडणुका संपल्यानंतर परतीच्या मार्गाला लागतील असे सांगत आपचा, दिल्लीचा विकास हा केंद्र सरकारमुळे झाल्याचे ते म्हणाले. काँग्रेसची (Congress) स्थिती अतिशय दोलायमान आणि भयंकर झाल्याचे सांगत मगो पक्षाने तृणमूल बरोबर केलेली युती ही ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असल्याचे ते म्हणाले.

खंवटे यांचे सरकारला अनेकवेळा सहकार्य : खंवटेचा सरकारला त्यावेळी झालेला विरोध हा विरोधी आमदार म्हणून झाला होता. तो विरोध आम्ही सकारात्मक दृष्टीने घेतलेला आहे. अनेक वेळा त्यांनी सरकारला सहकार्य केले आहे. पर्वरीसाठी रोहन खंवटे यांनी भरीव योगदान दिलेले आहे. दोन वेळा अपक्ष म्हणून निवडून येणे कठीण काम असते आणि ते काम त्यांनी केले आहे. पर्वरी मतदारसंघात भाजपला बळकटी देण्यासाठी आणि एकूणच गोव्याच्या विकासासाठी खंवटे यानी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पर्वरीत भाजपला आता डबल इंजिनची ताकद मिळाली असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT