पणजी : गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना हंगामी सभापती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदारांना गावकर आमदारकीची शपथ देणार असल्याची माहिती आहे.
विधानसभेचे विशेष अधिवेशन मंगळवारी 15 मार्च रोजी बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना हंगामी सभापती गणेश गावकर आमदारकीची शपथ देतील. सातव्या विधानसभेचे मुदत 16 मार्च रोजी संपत असल्याने त्यापूर्वी नवी विधानसभा (Goa Assembly) अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने हा सोपस्कार पार पाडण्यात येत आहे.
दरम्यान नवी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्रीपदासह मंत्रिपदांसाठी चुरस निर्माण होणार आहे. विश्वजीत राणे मुख्यमंत्रीपदावर (CM) दावा सांगू शकतात. त्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय गोटात चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे प्रमोद सावंत यांच्यासमोर विश्वजीत राणेंचं मोठं आव्हान असणार आहे. दुसरीकडे दिव्या राणे आणि जेनिफर मोन्सेरात यांच्यात मंत्रिपदावरुन कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. भाजप (BJP) या सर्वावर कसा तोडगा काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.