BJP
BJPDainik Gomantak

Goa Government: माविन, विश्वजीत, काब्राल यांची मंत्रिपदे निश्चित

जेनिफर, रोहन, गोविंद व रवी यांच्याबाबत चर्चा
Published on

पणजी: निवडणुकीत भाजपला काठावरचे बहुमत मिळाल्याने भाजपने मंत्रिमंडळ बनवताना सावध पवित्रा घेत चर्चा सुरू केली आहे. विधिमंडळ नेते पदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात मात्र  मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार? याबाबत उत्सुकता लागली आहे. सावंत मंत्रिमंडळातील पंचायत आणि वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, वीजमंत्री निलेश काब्राल या तिघांची मंत्रीपदे निश्चित झाली आहेत.

BJP
पेच कायम! शपथविधी लांबणीमुळे भाजपामध्ये अस्वस्थता

तर कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात, माजी मंत्री रोहन खंवटे आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक, बाबुश मोन्सेरात यांना मंत्रिमंडळात घ्यायचे का? यावर चर्चा सुरू आहे असल्याची माहिती आहे.याशिवाय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या आणि चार वेळेला आमदार म्हणून निवडून आलेल्या सुभाष शिरोडकर, पर्यटन मंत्रिपदाची धुरा संभाळलेल्या निळकंठ हळर्णकर आणि अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत चर्चा सुरू आहे.

BJP
मृत्युच्या जबड्यातून सुटून गोमंतकीय विद्यार्थी जेडेन मायभूमीत

रमेश तवडकर बनू शकतात सभापती

काणकोणचे आमदार रमेश तवडकर, सावर्डेचे आमदार गणेश गावकर हे अनुसूचित जाती जमातीचे नेते आहेत. त्यांच्यापैकी एकाला मंत्रिमंडळात घेतले जाण्याची शक्यता असून एकाला सभापतीपद दिले जाणार असल्याची माहिती आहे. किंवा तवडकर यांना सभापती आणि गावकर यांना उपसभापतीपद दिले जाऊ शकते का ? यावर चर्चा सुरू आहे .

जेनिफर की बाबूश मोन्सेरात

विधानसभेत दोघेही भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, जेनिफर मोन्सेरात डॉ.सावंत मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून कार्यरत होत्या. या दोघांपैकी कोणाला घ्यायचे यावर खल सुरू आहे. बाबूश मोन्सेरात यांचा दोघांनाही मंत्रिमंडळात घेण्याचा आग्रह आहे. मात्र, तो पक्षाला मान्य नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com