मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी आज म्हापशातील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राचीन मंदिरांना भेट देण्याच्या मोफत देवदर्शन यात्रेची (Free Devdarshan Yatra) घोषणा केली.  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

निवडणूक येताच राज्यात वाहू लागले मोफत देवदर्शन यात्रेचे वारे

आता राज्य सरकारतर्फे मोफत मोफत तीर्थयात्रेचे आयोजन, म्हापसा येथे मुख्यमंत्र्यांची घोषणा ज्येष्ठ नागरिकांना पर्वणी

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात (Goa) सत्तेवर आल्यास गोमंतकीयांसाठी मोफत तीर्थयात्रेचे आयोजन करण्याची हमी आम आदमी पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिली आहे. याला आठवडा उलटण्यापूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी आज म्हापशातील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राचीन मंदिरांना भेट देण्याच्या मोफत देवदर्शन यात्रेची (Free Devdarshan Yatra) घोषणा केली.

डॉ. सावंत हे आज खोर्ली - म्हापसा येथे घाट्येश्‍वर मंदिरातील सभागृहाच्या उद्‍घाटनासाठी आले होते. तेथे त्यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, नगरसेवक विराज फडके, देवस्थान समितीचे अध्यक्ष देश किनळेकर उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हापसा शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला जाईल. शहराच्या विकासासाठी लवकरच निविदा काढण्यात येतील. घाट्येश्‍वर मंदिर परिसर पर्यटन महामंडळातर्फे विकसित केला जाईल, अशी ग्वाही सावंत यांनी दिली.

1 ते 19 डिसेंबरपर्यंत चालणार योजना

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या विविध घोषणांची गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसून येते. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी राज्यातील प्राचीन मंदिरांना भेटी दिलेल्या नाहीत. त्यामुळे 1 ते 19 डिसेंबर या कालावधीत मोफत देवदर्शन यात्रा सुरू करण्यात येणार आहे. ही योजना समाजकल्याण खात्याची आहे. इच्छुकांना नावनोंदणी करताना या खात्याकडे मतदार किंवा आधार ओळखपत्र सादर करावे लागेल.

मोफत तीर्थाटन पुण्य की पाप?

‘फुकट खाणं पोट फुगरे’ अशी कोकणीत म्हण आहे. हिंदू, ख्रिस्ती व मुस्लिम धर्मात तीर्थयात्रेला मोठे महत्त्व आहे. जीवनात एकदा तरी तीर्थयात्रा करावीच, अन्यथा पुण्य लाभत नाही असे मानले जाते. म्हणूनच मुस्लिम हाज करतात, हिंदू काशी, गया तिर्थयात्रा करतात. तर ख्रिस्ती लोक वालांकिनी, नाशिक किंवा जेरुजेलीम यात्रा करतात. मात्र तिर्थयात्रा स्वतः कमावलेले धन खर्च करून करावी, असा दंडक आहे. आता आम आदमी पक्षाने सत्तेवर आल्यास तिर्थाटन मोफत करण्याचा वादा केला आहे. आता गोमंतकीय भाविक या मोफत तीर्थ यात्रेच्या आशेने झाडूला साथ देतात की, आपला स्वाभिमान दाखवतात हे निवडणुकीनंतर कळेलच. एक मात्र खरे, राजकीय पक्ष आजही साम - दाम - दंड - भेद ही चाणाक्य नीती विसरले नाहीत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT