Chandrakant Shetye Dainik Gomantak
गोवा निवडणूक

मंत्रीपद मिळाल्यास दुधात ‘साखर’: डॉ. चंद्रकांत शेट्ये

डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची खास मुलाखत

दैनिक गोमन्तक

तुकाराम सावंत

प्रश्न: कोणत्या कारणामुळे आपण भाजपला पाठिंबा दिला?

उत्तर: डिचोली मतदारसंघाचा विकास करण्यासाठीच आपण भाजपला पाठींबा दिला आहे. नवीन सरकारात जर मंत्रिपद मिळाले, तर दुधात ‘साखर’, अशा शब्दांत आपली अपेक्षा डिचोलीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त करीत डिचोलीचा विकास हाच आपला ध्यास असून, आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

प्रश्न: डॉक्टर ही निवडणूक तुमच्यासाठी कशी होती?

उत्तर: ही निवडणूक माझ्यासाठी महत्त्वीची होती आणि नक्कीच मोठे आव्हान होते. सभापती राजेश पाटणेकर आणि माजी आमदार नरेश सावळ यांच्या विरोधात मी निवडणुकीच्या (Election) मैदानात उतरलो होतो. यावरून कल्पना येईल.

प्रश्न: निवडणुकीत तुम्ही निवडून येणार याची आपणाला खात्री होती काय?

उत्तर: माझे बंधू शरद शेट्ये हे गेली जवळपास दहा वर्षे राजकारणात आहेत. यापूर्वी ते जिल्हा पंचायत निवडणुकीत निवडूनही आले होते. सत्ताधारी पक्षात नसतानाही गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत पुरस्कृत केलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यात यशस्वी ठरलो होतो. त्यामुळे मला राजकारणाचा अनुभव आहे. मला आणि आमच्या कुटुंबाला मतदारांनी पूर्णपणे ओळखले आहे. मतदारांचा विश्वास आणि पाठींबा यामुळे मी निवडून येणार याची खात्री होती, असे डॉ. शेट्ये म्हणाले.

प्रश्न: तुम्हाला मिळालेले मताधिक्य समाधानकारक आहे काय?

उत्तर: गृहीत धरलेले सगळेचजण मतदान करतातच असे नाही. तरीदेखील अपेक्षेप्रमाणे मते पडली आहेत. मताधिक्य कमी मिळाले, त्यामागे अन्य कारणे असू शकतात. शेवटी लोकांनी सेवेची संधी दिली, त्याला अधिक महत्त्व आहे.

प्रश्न: तुमच्या यशाचे श्रेय कोणाला द्याल?

उत्तर: अर्थातच मतदारांना आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेल्या सर्वांना. कुटुंबाचे पाठबळ आणि सर्वांचे आशीर्वादच मला विधानसभेत पोचवू शकले, अशा शब्दांत डॉ. शेट्ये यांनी मत व्यक्त केले.

प्रश्न: डिचोलीसाठी तुमचा संकल्प कोणता?

उत्तर: आता जबाबदारी नक्कीच वाढली आहे. डिचोली मतदारसंघाचा नियोजनबद्ध विकास हाच संकल्प घेऊनच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, साधनसुविधात्मक विकास करून मतदारसंघ आदर्श बनविण्यासाठी तसेच बेरोजगारी सोडविण्यासाठी आपण अधिक भर देणार आहे. मतदारांनी जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे, त्या विश्वासाला तडा देणार नाही.

प्रश्न: भाजपकडे मंत्रिपदाची मागणी केली आहात काय?

उत्तर: मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपला (BJP) पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे करताना कोणताही ‘डिमांड’ केलेला नाही. जर मंत्रिमंडळात समावेश झाला, तर आनंदच आहे. मंत्रिपद मिळाल्यास विकासाला गतीने चालना देण्यास मदत होणार असल्याचे शेट्ये यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT