‘ती’ कृती कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानेच: आलेक्स रेजिनाल्ड

आलेक्स रेजिनाल्ड यांची खास मुलाखत
Aleixo Reginaldo
Aleixo ReginaldoDainik Gomantak
Published on
Updated on

प्रमोद प्रभुगावकर

प्रश्न: कॉंग्रेसमधून बाहेरपडूनही आपण लोकांचा विश्वास कसा संपादन केला?

उत्तर: लोकांचा विश्र्वास हाच राजकारणात शेवटी महत्त्वाचा असतो. आपण लोकांना विश्र्वासात घेऊनच पुढे जात असतो. या निवडणुकीत जे यश मिळाले ते या मतदारांमुळेच. त्यामुळे यापुढेही आपण त्यांच्या विश्र्वासास पात्र असेन, असे अभिवचन कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी दिले. जनतेशी असलेली नाळ तसूभरही कमी होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रश्न: यावेळची निवडणूक वेगळी वाटली का?

उत्तर: कुडतरीचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची आपली ही चौथी वेळ आहे. या वेळची निवडणूक वेगळी होती व तिची पार्श्र्वभूमीही वेगळी होती, हे खरे असले तरी त्याचा आपणाला फारसा फरक पडला नाही. कारण कुडतरीची एकूणएक माहिती आपणाजवळ होती. तेथील समस्यांबाबत आपण नेहमीच आक्रमक राहिलेलो आहे. त्यामुळे लोकांसाठी झटणारा, प्रसंगी लोकांच्याच पाठिशी राहणारा आमदार म्हणून माझी प्रतिमा होती व अजूनही ती कायम आहे, असे रेजिनाल्ड म्हणाले.

Aleixo Reginaldo
काँग्रेसश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पेलू: मायकल लोबो

प्रश्न: आपण दोन पक्ष बदलले यावर काय सांगाल?

उत्तर: प्रथम सेव्ह गोवा व नंतर कॉंग्रेस (Congress) हे पक्ष आपण बदलले ते लोकांच्या आग्रहास्तव. अगदी हल्लीसुद्धा आपण जे पक्ष बदलले तेही कुडतरीवासीयांवर अन्याय होऊ नये म्हणून. आपली ती कृतीही कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊनच होती. त्यामुळेच आपण पुन्हा निवडून आलो तो सुध्दा मोठ्या फरकाने. या एकंदर घडामोडीत आपणाला अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह कुडतरीतील मतदारांनीच धरला होता. प्रचारासाठी फार वेळ नव्हता. पण, लोकांनी व कार्यकर्त्यांनी ती जबाबदारी खांद्यावर घेतली. जास्त प्रचारही करावा लागला नाही. पत्रके. पोस्टर्स वगैरेसाठी वेळ नव्हता व त्यामुळे शक्य त्या वाड्यांवर जाऊन लोकांना एकंदर कल्पना दिली. त्यांनीही अडचणी समजून घेतल्या व सहकार्य केले.

प्रश्न: कमी वेळात निवडणुकीचा कार्यक्रम कसा आखला?

उत्तर: अपक्ष असल्याने आपण जाहीरनामा वगैरे तयार करण्याच्या फंदात पडलो नाही. याउलट अन्य प्रतिस्पर्ध्यांनी जाहीरनामे व निवडणूक कार्यक्रम तयार केले. पण, या प्रत्येकाचा रोख आपणाविरुध्द होता. त्यामुळे त्यांच्या त्या टिका-टीप्पणीतूनच आपला अधिक प्रचार झाला. आपल्या प्रचाराचा सारा भर निसर्गसंपन्न कुडतरीचे जतन करणे हा होता. आपल्या या पूर्वीच्या आमदारकीच्या कारकिर्दीत आपण सातत्याने तेच प्रयत्न केले व आताही त्यावरच भर दिला. आपली ही धडपड व प्रामाणिकपणा लोकांना भावला व त्यांनी आपणाला भरभरुन मते दिले हाच या निकालाचा निष्कर्ष असल्याचे रेजिनाल्ड म्हणाले.

Aleixo Reginaldo
Goa Election: मतांच्या टक्केवारीत 'आरजी' पक्ष राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

प्रश्न: आपली आमदार म्हणून पुढील भूमिका काय असेल?

उत्तर: आपल्या भावी पवित्र्याबाबत आत्ताच बोलणे योग्य नव्हे. पण, पण कुडतरीचा विकास, तेथील निसर्ग संपदेचे जतन यावर आपला भर राहील. त्यासाठी योग्य ते सर्व काही करेन. अडचणीच्या काळात जनतेने व भाजप (BJP) नगरसेवकांनी निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबाबत विचारता माझे एकंदर कार्य पाहून अनेकजण पक्षीय अभिनिवेश बाजूस सारून वावरले आहेत, असे मोघम उत्तर रेजिनाल्ड यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com