Babush Monserrat Dainik Gomantak
गोवा निवडणूक

ताळगावात जेनिफर नव्हे ‘बाबूश’नाच टोनीचे आव्हान!

दैनिक गोमन्तक

पणजी: ताळगाव मतदारसंघ हा बाबूश मोन्सेरात यांचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो. 2002 साली बाबूश मोन्सेरात यांनी युनायटेड गोवन्स डेमोक्रेटिक पार्टी (युगोडेपा) तर्फे कॉंग्रेसचे तत्कालिन मंत्री सोमनाथ जुवारकर यांचा पराभव करून ताळगावमध्ये ‘एंट्री’ केली. आणि तिथून त्यांनी ताळगाववर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. (equations have changed since Babush Monserrat and Jennifer joined BJP for assembly goa election)

2007 साली या यशाची त्यांनी पुनरावृत्ती केली. पण 2012 साली त्यांनी हा मतदारसंघ आपली पत्नी जेनिफरकडे देऊन सांता क्रूझकडे कुच केली. कॉंग्रेस विरोधी हवा असूनही दोघेही पती-पत्नी कॉंग्रेसच्या (Congress) उमेदवारीवर विजयी झाले. 2017 साली बाबूश यांचा पणजीत पराभव झाला असला तरी ताळगावात जेनिफर विजयी झाल्याच. यातून बाबूश यांचे ताळगाववरचे वर्चस्व स्पष्ट होते. पण 2019 मध्ये बाबूश अन् जेनिफर या दोघांनी भाजपमध्ये (Goa BJP)प्रवेश केल्यामुळे आता समीकरणे बदलली आहेत. जेनिफर आता भाजपच्या उमेदवार आहेत. त्या जरी ताळगावच्या आमदार असल्या तरी मतदारांना बाबूशच जवळचे वाटतात. त्याला बाबूश (Babush Monserrate) यांचा मतदारांशी असलेला संपर्क कारणीभूत आहे.

‘आप’तर्फे सेसेलिया रॉड्रिग्स या रिंगणात उतरल्या असून त्यांनी आतापर्यंत ताळगावात बरेच उपक्रम केलेले आहेत. त्यामुळे त्याही या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मगोपतर्फे शुभांगी सावंत या रिंगणात असून या मतदारसंघात मगोपची विशेष ताकद नसल्यामुळे त्या प्रभाव पाडतील, असे वाटत नाही. रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे जोझेफ रॉन्कॉन हे रिंगणात असून ते ही काय करिष्मा दाखवतात, ते बघावे लागेल. त्याचप्रमाणे दिलीप घाडी, पुंडलिक रायकर व शिवानंद हरिजन हे अपक्ष असून ते कोणाची किती मते घेतात हे पाहावे लागेल. पण सध्या या मतदारसंघात जेनिफर यांच्यापेक्षा बाबूश यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून उदय मडकईकर टोनी रॉड्रिग्स व दत्तप्रसाद नाईक हे कोणता ‘रंग’ आणतात त्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 2002 पासून बाबूश यांचा अभेद्य किल्ला असलेला मतदारसंघ विरोधकांनी सर केला तर तो बाबूश यांना मोठा धक्का असेल, असा तर्क विश्लेषक वर्तवत आहेत. यामुळेच पणजीत मोठे आव्हान असूनही बाबूश यांना ताळगाववरही लक्ष केंद्रीत करावे लागत आहे. आता खरेच बाबूश ताळगावचा आपला गड राखतात,की ‘टोनी ॲंड कंपनी’ या गडावर आपला झेंडा फडकावते, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

टोनी-उदयमुळे जेनिफर समोर संकट !

कॉंग्रेसतर्फे पणजीचे माजी महापौर टोनी रोड्रिग्स हे रिंगणात उतरले असल्यामुळे मोन्सेरात दाम्पत्यापुढचे आव्हान गडद झाले आहे. टोनी हे एकेकाळचे बाबूश यांचे निकटवर्तीय असल्यामुळे ते त्यांच्या डावपेचाशी चांगलेच परिचित आहेत. ते सध्या प्रचाराचा ‘धुरळा’ उडवत असून त्यांना माजी महापौर उदय मडकईकर यांची साथ लाभत आहे. मडकईकर हेही एकेकाळी बाबूश समर्थक होते. पण त्यांना पणजीचे महापौरपद न दिल्यामुळे ते बाबूश यांच्या विरोधात गेले आहेत. सध्या टोनी- मडकईकर जोडी ताळगावात धमाल उडवत आहेत. या जोडीमुळे बाबूशना कठीण परिस्थितीशी सामना करावा लागत आहे.त्याचबरोबर गेल्या दोन निवडणुकांत ताळगावातील भाजपचे उमेदवार असलेले दत्तप्रसाद नाईक हेही बाबूश यांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर भाजपचे काही कार्यकर्तेही फिरताना दिसत आहेत. यामुळे बाबूश यांना आता आपल्या जुन्या कार्यकर्त्यांवर विसंबून रहावे लागत आहे.

कॅथलिक मतदारांत नाराजी !

मोन्सेरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काही कॅथलिक लोक नाराज असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे पक्षांतर जेनिफर याना महागात पडते की, काय असा प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे. आणि याचे पडसाद सध्या ताळगावात उमटताना दिसत आहेत. तसे पाहता बाबूश यांनी ताळगावचा बराच विकास केल्याचे दिसत आहे. सध्या बाबूश विरोधी ‘हवा’ निर्माण करण्यात काही कार्यकर्ते सफल झाल्याचे दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT