Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोवा निवडणूक आयोगाचा ‘रात्रीस खेळ चाले’

कर्मचाऱ्यांचे जागरण: दुसऱ्या दिवशी पोचले ‘स्ट्राँग रूम’मध्ये ईव्हीएम

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. मात्र, मतदान यंत्रे ‘स्ट्राँग रूम’मध्ये पोहचण्यास मंगळवारचे दुपारचे 12 वाजले. त्यामुळे ही मतदान यंत्रे घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना रात्रभर जागरण करावे लागले. सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास पहिली मतदान यंत्रपेटी सील करून ठेवण्यात आली. फॉर्म भरणे, यंत्रे सील करणे या किचकट प्रक्रियेमुळे विलंब झाल्याचे सांगण्यात आले.

मतदान यंत्रे ठेवण्यासाठी आल्तिनो-पणजी येथील पॉलिटेक्निकच्या इमारतीत स्ट्रॉंग रूम तयार केली आहे. स्ट्राँग रूम असलेल्या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे तसेच कडक बंदोबस्त ठेवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ही निवडणूक मतपत्रिकांऐवजी ईव्हीएम मशीनच्या साहाय्याने घेतली तरीही सर्व मशीन्स स्ट्राँग रूममध्ये पोहोचण्यास मतदान संपल्यानंतर सुमारे १५ तास लागले.

दुसऱ्या दिवशीच्याही कामाचा खोळंबा

स्‍ट्राँग रूममधील अधिकारी तसेच ही यंत्रे घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना सोमवारची पूर्ण रात्र जागे राहावे लागले. मंगळवारी कामकाजाचा दिवस असूनही बहुतेक कर्मचाऱ्यांनी अनुपस्थिती लावली. काल झालेल्या उशिरामुळे त्यांना मुभा देण्यात आली. मात्र, या दिरंगाईबद्दल कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणुकीची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असल्याने ते त्यात निष्काळजीपणा करू शकत नव्हते.

स्ट्राँग रूममध्येही विलंब

ही सीलबंद केलेली ईव्हीएम (EVM) यंत्रे विविध तालुक्यांमधून पणजीतील पॉलिटेक्निक इमारतीमध्ये तेथे आखून ठेवलेल्या जागीच ठेवली जात होती. तेथील सोपस्कार पूर्ण करण्यासही वेळ लागत होता. सोमवारी रात्री अडीच वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी 11.40 पर्यंत ईव्हीएम यंत्रे सुरक्षितरित्या स्ट्राँग (strong) रूममध्ये ठेवण्याचे काम सुरू होते.

‘राऊंड द क्लॉक’ सुरक्षा

ज्या ठिकाणी ईव्हीएम यंत्रे ठेवली आहेत, त्या खोल्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सील लावले आहे. या इमारतीभोवती सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तसेच या ठिकाणी उपअधीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांना ‘राऊंड द क्लॉक’ सुरक्षा ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. गोवा पोलिसांबरोबरच निमलष्करी दलाचे शस्त्रधारी पोलिस तेथे तैनात आहेत.

सायंकाळी उशिरापर्यंत मतदान

उत्तर गोव्यात 19 मतदारसंघांत मतदान झाले. काही केंद्रांवर संध्याकाळी 5 वाजल्यानंतरही मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करून तालुक्यातील निर्वाचन अधिकाऱ्यांकडे जाण्यास केंद्रावरील कर्मचाऱ्यांना उशीर झाला. एकाच तालुक्यामध्ये सरासरी पाच मतदारसंघ असल्याने केंद्रातील ईव्हीएम यंत्रे तसेच दिवसभरातील मतदानाची नोंद, माहिती पडताळून पाहण्यासाठी, त्यानंतर विविध फॉर्म भरून यंत्र सीलबंद करण्यासाठी बराच वेळ लागत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT