Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: 'खोटारडेपणा अन् अकार्यक्षमतेची भाजप सरकारची 10 वर्षे'

दैनिक गोमन्तक

मडगाव: मागील दहा वर्षात रोजगार निर्मीती करण्यास, गोंयचे दायज योजना तसेच गोवा व्हिजन 2035 अहवाल चालीस लावण्यास तसेच कायदेशीर खाण व्यवसाय सुरू करण्यास अपयशी ठरलेल्या भाजपला इतिहासाची पाने परतवुन लोकांची दिशाभूल करण्याचा नैतीक अधिकार नसल्याचा टोला विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी मारला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) आणि भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे (Sadanand Tanawade) यांनी केलेल्या आरोपांचे जोरदार खंडन करताना, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांनी टीका केली. भाजप सरकारने (BJP Government) 2012 ते 2022 च्या कार्यकाळात, राज्यपाल व लोकायुक्तांकडून भ्रष्टाचारचे प्रमाणपत्र मिळवून इतिहास रचला असल्याचा टोमणा मारुन भाजप नेत्यांवर जोरदार पलटवार केला. (Digambar Kamat Criticized BJP)

कॉंग्रेस सरकार काळात समाज कल्याणाच्या योजना राबविल्याच नाहीत अशी बेताल वक्तव्ये करून आपलेच हसे करुन घेतलेल्या भाजप नेत्यांनी माझ्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने 2007 ते 2012 दरम्यान चालीस लावलेल्या योजनांचा अभ्यास करावा असा सल्ला दिगंबर कामत यांनी दिला आहे. भाजप सरकारने 2012 मध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही सुरू केलेली "गोंयचे दायज" योजना बासनात गुंडाळून ठेवली. खाजेकार, फुलकार, रेंदेर, पोदेर, मोटरसायकल पायलट, काणकोणकार तसेच इतर पारंपारीक व्यावसायीकांना दिलासा देणारी योजना चालीस न लावण्याचे भाजपने केलेले पापाला गोमंतकीय कदापी माफ करणार नाहीत. भाजपच्या असंवेदनशीलतेने आज पारंपारीक व्यावसायीक आर्थिक ओझ्याखाली चिरडले आहेत.

तथाकथीत डबल इंजीनचे सरकार असताना, त्यांनीच जाहिर केलेल्या 50 हजार नोकऱ्या देणे तसेच कायदेशीर खाण व्यवसाय सुरू करणे सरकारला जमले नाही. यावरुनच भाजपचा खोटारडेपणा उघड होतो असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. कोविड रुग्णांचे ऑक्सिजनच्या अभावी प्राण घेणाऱ्या भाजप सरकारला आता त्यांच्या कुटूंबियांकडे मते मागण्यासाठी जाण्याचा नैतीक अधिकार नाही. येत्या 14 फेब्रुवारीला देशातुन भाजप राजवटीच्या अंताला सुरूवात होणार आहे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT