Devendra Fadnavis  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

देवेंद्र फडणवी: अन्याय झाल्याचे सांगून मते मिळवण्यासाठी ची धडपड

दैनिक गोमन्तक

सांगे: अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी तीन वर्षे भाजप सरकारसोबत राहूनही मतदारसंघाचा विकास करू शकले नाहीत. वरून ते माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी आपली विकासकामे अडवून ठेवल्याचा आरोप करून आपल्यावर अन्याय झाल्याचे चित्र लोकांना दाखवून मते मिळवण्यासाठी धडपडत आहेत, अशी टीका भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी नेत्रावळी येथे कोपरा बैठकीत केली.

यावेळी सुभाष फळदेसाई, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुरेश केपेकर, रिवणचे सरपंच सूर्यकांत नाईक, नेत्रावळीचे सरपंच शशिकांत गावकर, सांगेचे नगराध्यक्ष कॅरोज क्रुझ, माजी नगरसेवक संजय रायकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

गावकर यांनी पाच वर्षांत मतदारसंघ आणि लोकांसाठी काहीच केले नाही. त्यामुळे प्रचारात दाखविण्यासारखे काहीच नसल्याने फळदेसाईंकडे बोट दाखविण्यापलीकडे काहीच केले नाही. काही भाजप कार्यकर्ते बंडखोरी करून दुसऱ्या उमेदवाराला मिळाले म्हणून भाजपच्या उमेदवारावर परिणाम होणार नाही. त्या बंडखोरीला गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नाही. स्व. मनोहर पर्रीकर यांचे नेत्रावळीवर विशेष प्रेम होते. विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी नेत्रावळीला भरभरून दिले.

काँग्रेसच्या काळात राज्याने केवळ अस्थिरता पाहिली. केंद्रात काँग्रेसचे सरकार असूनही तेव्हाचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना 100 कोटीसुद्धा राज्यासाठी आणता आले नाही. पण केंद्रातील भाजप सरकारने राज्याला 24 हजार कोटी रुपये दिले, अशी माहिती त्यांनी दिली.

खासगी कर्मचाऱ्यांच्या ‘पीएफ’मध्ये पाच हजार काही

पक्ष युवकांना बेकारी भत्ता देऊन लाचार बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भाजप सरकारला युवक स्वत:च्या पायावर उभे राहिलेले हवे आहेत. खासगी नोकरीत सुरक्षा देण्याच्या हेतूने त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत सरकार दरमहा पाच हजार रुपये भरणार आहे. त्याचा लाभ त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मिळणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

निवडून येताच गावकर गायब

पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रसाद गावकर हे मतदारसंघाचे मालक असल्यासारखे वागले; पण यंदा मालकाला नव्हे, तर सुभाष फळदेसाईसारख्या सेवकाला निवडून द्या. फळदेसाई यांचा 2017 मध्ये काही मतांच्या फरकाने पराभव झाला; पण पराभवाने खचून न जाता गेली पाच वर्षे त्यांनी लोकांची सेवा केली आहे. याउलट गावकर निवडून येताच मतदारसंघातून गायब झाले, असे फडणवीस म्हणाले.

विकासकामात सांगे अपवाद

यावेळी सुभाष फळदेसाई म्हणाले, आम्हाला जिंकूनच यायचे नाही, तर मोठ्या मताधिक्याची आघाडी घ्यायची आहे. सावरी, साळजिणीत वन खात्याच्या हेकेखोरपणामुळे विकास करता येत नव्हता. पण मी दोन्ही गावांसाठी रस्ते बांधून दिले. मानगाळ कार्ला या गावात रस्ते नेले आणि हरित क्रांती करून दाखवली. सांगेचे आमदार प्रसाद गावकर हे आळशी आहेत. कोरोनामुळे सांगेत कामे करता आली नाहीत, अशी कारणे देणाऱ्या गावकरांनी कोरोनाची स्थिती सांगेतच नव्हे, तर राज्यातील 40 ही मतदारसंघांत होती. सर्व 39 मतदारसंघांत विकास झाला. त्यात सांगे मात्र अपवाद राहिला, अशी टीका त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT