‘पिंक’ बुथ ठरणार गोवा राज्यात आकर्षणाचे केंद्र

अनोखा प्रयोग: महिलांच्या सुरक्षेसाठी खास संकल्पना, आयोगाचे कौतूक
Pink Booth
Pink BoothDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी या निवडणुकीतही खास ‘पिंक’ बुथ संकल्पना राबविण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशानंतर गोव्यातही ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही राज्यात ही संकल्पना राबविण्या आली होती. विविध मतदारसंघात ‘पिंक’ बूथ स्थापन करण्यात येणार आहेत.

Pink Booth
काँग्रेसने प्रचाराची खालची पातळी गाठली: मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत

उपलब्ध माहितीनुसार, डिचोलीसह साखळी आणि मये मतदारसंघात असे प्रत्येकी तीन बुथ स्थापन करण्यात येणार आहेत. मयेसह काही भागात पिंक मतदान केंद्रे सज्जही झाली आहेत. पिंक बूथांप्रमाणेच विशेषसह ‘मॉडेल’ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. मये मतदारसंघात बुथ क्र. 6, 22 आणि 43 हे पिंक बूथ आहेत. तर बूथ क्र. 36 ‘मॉडेल’ केंद्र असणार आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच राबविण्यात आला होता. त्याचे कौतुक करण्यात आले होते.

Pink Booth
गोव्यात अधिकृत प्रचार संपला, आता गुप्त प्रचार सुरू?

त्यानंतर गोव्याने ही संकल्पना राबविली. आता पंजाब, गुजरातसह उत्तरपूर्व भागात ही संकल्पना राबविण्यात येत आहे. दरम्यान, गोवा राज्यात महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने अशा उपक्रमांचे कौतूक होत आहे.

Pink Booth
गोव्यात काँग्रेसमध्ये पक्षांतराचा इतिहास पुन्हा होणार नाही

बुथची वैशिष्ट्ये

पिंक बुथवर महिला मतदारांना मतदान करता येणार आहे. मतदान केंद्राला पूर्णपणे गुलाबी साहित्याने सजवण्यात येते. मतदान अधिकारी, पोलिस सुरक्षा जवान ते अन्य कर्मचारीवर्ग या महिलाच असतात. कर्मचारीही प्रामुख्याने गुलाबी रंगाचे कपडे परिधान करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com