Goa Elections

 
दैनिक गोमन्तक
गोवा निवडणूक

Goa Elections: काँग्रेस पक्ष मजबुतीने भाजपचा पराभव करण्यासाठी सज्ज: नंदादीप राऊत

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मजबुतीने सत्ताधारी भाजप पक्षाचा पराभव करण्यासाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती काँग्रेस नेते तथा मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादिप राऊत यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

Goa Elections: गोवा प्रदेश काँग्रेस यंदा राज्यात बदल घडवण्यासाठी तयार झाला आहे. यात वास्को मतदारसंघाचा महत्त्वाचा वाटा असेल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मजबुतीने सत्ताधारी भाजप पक्षाचा पराभव करण्यासाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती काँग्रेस नेते तथा मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादिप राऊत यांनी दिली.

नंदादीप राऊत यांनी गोवा प्रदेश काँग्रेस (Goa Pradesh Congress) पक्षात प्रवेश केल्यापासून त्यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. राऊत यांनी घरोघरी प्रचार करून रहिवासीयांना भाजपमुळे (BJP) वाढलेल्या महागाईची माहिती देत जागृती केली. यावेळी त्यांच्यासमवेत अखिल गोवा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान, साजिद शेख, नगरसेविका प्रिया राऊत, तुषार नाईक, सचित नाईक, प्रशांत तांडेल, दामोदर तांडेल, राजेश्री नाईक, निकोलस डायस, शोभावती बांदोडकर, दीप्ती नाईक, मेघा वालांजो, तुळशीदास कुंकळेकर, दर्शन राऊत, स्वप्नील नाईक, तन्वीर सौदागर उपस्थित होते.

नजीर खान म्हणाले, भाजपने जनतेला महागाईच्या विळख्यात टाकले. सामान्य जनता भाजप सरकारच्या सत्तेला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल. भ्रष्टाचारी भाजप नेत्यांना जनता कदापि माफ करणार नसल्याची माहिती खान यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT