P Chidambaram  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

...तर निवडणुकीनंतर शिवसेना-राष्ट्रवादीसोबत गोव्यात आघाडी करणार : चिदंबरम

गोव्यात 14 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) एकत्र आले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र येणार अशी चर्चा होती. मात्र कॉंग्रेसने गोव्यात 'महाविकास आघाडी' करण्यास नकार दिला. याबाबत बोलताना अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) गोवा निवडणूक निरीक्षक पी चिदंबरम म्हणाले की, निवडणुकीनंतर गोवाच्या विकासासाठी आम्हाला राष्ट्रवादी, आणि शिवसेनेबरोबर काम करण्याची संधी मिळाली तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. (Goa Assembly Election 2022 Live Udpates)

गोव्यात (Goa) 14 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) एकत्र आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेने (Shiv Sena) देखील निवडणुकीसाठी युती केली आहे. हे दोन्ही पक्ष मिळून 24 जागा लढवणार आहेत. दोन्ही पक्षांनी समान जागा वाटून घेतल्या आहेत.

चिदंबरम म्हणाले की, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे महाराष्ट्रात काँग्रेसचे मित्रपक्ष आहेत. गोव्यात देखील आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. निवडणुकीआधी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी-शिवसेनेने काही प्रस्ताव दिले आणि आमच्याकडेही काही प्रस्ताव होते. दुर्दैवाने आमचे कुठल्याही प्रस्तावावर एकमत झाले नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पुढे म्हणाले.

महाराष्ट्रात (Maharashtra) 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT