Congress Leaders Dainik Gomantak
गोवा निवडणूक

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर झळकले कॉंग्रेस नेते

विविध संस्थांच्या जनमत चाचण्यांच्या आधारे गोव्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी आहे. जनता कुणाला कौल देणार हे येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर 8 मार्च रोजी कॉंग्रेसचे काही नेते झळकले. हा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चेला उधाण आले.

एक्झिट पोलमुळे अपक्ष उमेदवारांचा बोलबाला

विविध संस्थांच्या जनमत चाचण्यांच्या आधारे गोव्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे भाकीत केल्याने छोटे पक्ष आणि अपक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. यात आप, मगो पक्ष, तृणमूल काँग्रेस यांच्यासह अपक्षांचा समावेश आहे. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी या संभाव्य निवडून येणाऱ्या उमेदवारांसह छोट्या पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करत आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम, दिनेश गुंडू राव यांनी मगोपचे सुदिन ढवळीकर, दीपक ढवळीकर यांच्याशी चर्चा करून सत्तेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावर निवडणूकपूर्वी आघाडी केलेल्या तृणमूल काँग्रेसबरोबर चर्चा करून याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल असे ढवळीकर यांनी सांगितले. तर मगोप भाजपसोबत जाणार नसून आपणाला शब्द दिल्याचे चिदंबरम यांनी सांगितला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT